Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महिलेची भररस्त्यात गळा चिरून हत्या; हत्येनंतर आरोपी चाकू घेऊन 15 मिनिटं फिरत होता मृतदेहाजवळच

महिलेची भररस्त्यात गळा चिरून हत्या; हत्येनंतर आरोपी चाकू घेऊन 15 मिनिटं फिरत होता मृतदेहाजवळच

कोटा : राजस्थानमधील कोटा शहरात भरदिवसा रस्त्यावर एका विवाहित महिलेचा गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

कमलेश असे मृत महिलेचे नाव आहे. हत्येनंतर आरोपी हातात चाकू घेऊन रक्ताच्या थारोळ्यात निचपत पडलेल्या महिलेच्या अवती-भवती सुमारे 15 मिनिटे फिरत होता. त्यामुळे भीतीपोटी महिलेच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. महिलेचा तडफडून मृत्यू झाल्यानंतरच आरोपी तेथून निघून गेला आणि थेट पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. काही काळापूर्वी आरोपी वीरूची बहिण कमलेशच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत पळून गेली आणि लग्न केले. तेव्हापासून आरोपीला कमलेशला धडा शिकवायचा होता.


संधी साधून त्याने भरदिवसा रस्त्याच्या मधोमध चाकूने महिलेचा गळा चिरला आणि काही वेळ तसाच उभा राहिला. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर हल्लेखोर चाकू घेऊन थेट गुमानपुरा पोलिस ठाण्यात गेला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.