Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ज्येष्ठ नागरिकांसाठी सांगलीत 13 ऑक्टोबरला कार्यशाळा

ज्येष्ठ नागरिकांसाठी सांगलीत 13 ऑक्टोबरला कार्यशाळा


सांगली दि. 9 ‍: सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी  समाजकल्याण विभागामार्फत दि. 13  ऑक्टोबर 2023 रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत ज्येष्ठ नागरिकांचे कायदे व हक्क या विषयावर जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर प्रविण नरडेले हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेस ज्येष्ठ नागरिकांनी  दि. 13 ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, कलानगर, जुना बुधगाव रोड, सांगली या ठिकाणी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन समाजकल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.

या कार्यशाळेत माहिती अधिकार अधिनियम 2005 बाबत माहिती अधिकार व्याख्याते शाहीन शेख तर माधवबागचे डॉ. सचिन पाटील व डॉ. प्रियांका गायकवाड हे हृदयरोग व मधुमेह निर्मुलनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्रतपासणी करण्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्री. चाचरकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.