Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महानगरपालिकेकडून 13 आणि 14 ऑक्टोंबर रोजी ई वेस्ट कचरा संकलन मोहीम

महानगरपालिकेकडून 13 आणि 14 ऑक्टोंबर रोजी ई वेस्ट कचरा संकलन मोहीम


सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून 13 आणि 14 ऑक्टोंबर रोजी ई वेस्ट कचरा संकलन मोहीम आयोजित करण्यात आल्याची माहिती उपआयुक्त वैभव साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मोहिमेत नागरिकांनी आपल्याकडील ई वेस्ट तसेच इलेक्ट्रॉनिक कचरा.


महापालिकेच्या संकलन केंद्रावर देऊन सहकार्य करावे असे आवाहनही साबळे यांनी केले.  महापालिकेकडून वर्षातून तीनवेळा ई वेस्ट संकलन मोहीम हाती घेतली जाते. आतापर्यंत अशा मोहिमेच्या माध्यमातून 9 टन ई कचरा संकलित झाला आहे. अशाच प्रकारची ई कचरा संकलन मोहीम 13 आणि 14 ऑक्टोंबर  रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत हा कचरा महापालिका क्षेत्रातील 20 केंद्रांच्या माध्यमातून संकलित केला जाणार आहे. नागरिकांनी या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपल्याकडील ई वेस्ट तसेच इलेक्ट्रॉनिक कचरा 

महापालिकेच्या संकलन केंद्रावर देऊन सहकार्य करावे . महापालिकेकडे जमा झालेले ई वेस्टचे पर्यावरण विषयक काम करणाऱ्या एनजीओच्या माध्यमातून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे. त्यामुळे जास्तीजास्त नागरिकांनी आपल्याकडील अनावश्यक, वापरात नसलेला ई कचरा या मोहिमेमध्ये देऊन सहकार्य करावे असे आवाहनही उपआयुक्त वैभव साबळे यानी केले आहे. यावेळी वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, जनसंपर्क अधिकारी डीव्ही हर्षद, मीडिया समन्वयक दीपक चव्हाण, पृथ्वी झिरो वेस्ट , इकोसत्त्व या संस्थांचे प्रतिनिधी डॉ माधवी पटवर्धन , सायली दौंडे, पवन ठोंबरे आदी उपस्थित होते.

 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.