Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अंस ठिकाण जिथे घड्याळात 12 कधी वाजतच नाहीत; कारण ही आहे अजब

अंस ठिकाण जिथे घड्याळात 12 कधी वाजतच नाहीत; कारण ही आहे अजब


नवी दिल्ली : डिजीटल वॉच आणि मोबाईल सोडता हातातलं घड्याळ असो वा भिंतीवरील सामान्यपणे घड्याळात बारा आकडे असतात. दुपारी आणि रात्र असे दोन वेळा 12 वाजताच म्हणजे 24 तासांचा एक दिवस पूर्ण होतो.
पण असं ठिकाण जिथं घड्याळात 12 कधीच वाजत नाहीत. तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण यामागील कारणही अजब आहे.
हे शहर आहे जगातील सर्वात सुंदर देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वित्झर्लंडमध्ये. या शहराचं नाव आहे. सोलोथर्न ऑफ स्वित्झर्लंड. या शहरातील सर्वा घड्याळांमध्ये फक्त 11 अंक आहेत म्हणून तिथं 12 वाजत नाहीत. या शहरात टाऊन स्क्वेअरवर एक घड्याळ बसवलं आहे, जे ए क्लॉक ऑन टाऊन स्क्वेअर म्हणून प्रसिद्ध आहे. हे घड्याळ या शहराची ओळख देखील दर्शवतं. त्यातही कधी 12 वाजत नाहीत. कारण त्यात फक्त अकराच आकडे आहेत. या शहरातील सर्व घड्याळे अशी आहेत की त्यांना फक्त 11 पर्यंत अंक आहेत. इथल्या चर्च आणि चॅपलमध्ये बसवलेल्या घड्याळांवरही अकरापर्यंतच अंक आहेत.

घड्याळात 11 नंबर असण्याचं कारण म्हणजे या क्रमांकावर असलेलं लोकांचं प्रेम. शेवटी 11 नंबरच्या मागे एवढे वेड कशासाठी? शहरातील लोकांचे अकरासाठीचं हे प्रेम आत्तापासूनचं नसून शतकानुशतके चालत आलं आहे, असं मानलं जातं. यामागे एक कहाणी आहे. अस म्हणतात की सोलोरठाणचे लोक खूप कष्ट करायचे, परंतु कठोर परिश्रम करूनही ते त्यांच्या आयुष्यात दुःखी होते. तेवढ्यात या शहराच्या डोंगरातून एक योगिनी आली. तो लोकांना प्रोत्साहन देऊ लागला. त्यामुळे लोकांच्या जीवनात आनंद येऊ लागला. एल्फमध्ये अलौकिक शक्ती होती. जर्मनमध्ये एल्फ म्हणजे 11, म्हणून सोलोथर्नच्या लोकांनी प्रत्येक काम अकराशी जोडण्यास सुरुवात केली.

इथल्या फक्त घड्याळांवरच 11 अंक आहेत असं नाही. तर इथल्या बहुतेक गोष्टी 11 क्रमांकाशी संबंधित आहेत. जुने धबधबे, म्युझियम आणि टॉवर यांचाही क्रमांक 11 आहे. सेंट उर्ससच्या मुख्य चर्चमध्ये (चर्च) देखील 11 क्रमांकाचे महत्त्व स्पष्टपणं दिसून येतं. चर्च बांधण्यासाठी 11 वर्षे लागली. त्याला फक्त 11 दरवाजे आणि 11 खिडक्या आहेत. आणखी एक खास गोष्ट म्हणजे इथले अनेक लोक 11 तारखेला वाढदिवसही साजरा करतात. लोकांना दिलेल्या भेटवस्तू देखील 11 शी संबंधित आहेत.

Quora या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लोक अनेक प्रश्न विचारतात. त्यातील उत्तरातून बरीच माहिती मिळते. क्वोरावर विचारण्यात आलेलाच हा प्रश्न, ज्यात असं शहर माहिती आहे का? जिथं घड्याळात 12 वाजत नाहीत, याबाबत विचारण्यात आलं. या शहराचं नाव सांगितल्यानंतर त्यामागे कारणही अनेकांनी सांगितलं आहे. M.B.L शर्मा नावाच्या Quora युझरने ही माहिती शेअर केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.