Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्नाटकमधील फटाक्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत 12 जणांचा मृत्यू; व्हिडिओ पहा

कर्नाटकमधील फटाक्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत 12 जणांचा मृत्यू; व्हिडिओ पहा

कर्नाटकात शनिवारी सायंकाळी फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत होरपळून 12 जणांचा मृत्यू झाला असून चार गंभीर जखमी झाले आहेत. या चौघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडे चारच्या सुमावार बंगळुरुतील अनेकल तालुक्यातील अट्टीबेले येथे फटाक्यांच्या गोदामाला आग लागली. आगीमुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गोदामात साठवलेल्या फटाक्यांनी अवघ्या काही सेकंदात पेट घेतला आणि मोठे स्फोट झाले.

फटाक्यांच्या दुकानाला आग लागल्याची माहिती मिळताच अगनिशमन दलाच्या पाच गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी गोदामामध्ये घुसून जखमी कामगारांना बाहेर काढले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या आगीमध्ये गोदामासह अनेक वाहनंही जळून खाक झाली आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


 बालाजी क्रॅकर्स नावाच्या दुकानाच्या गोदामामध्ये एका ट्रकमधून फटाके नेली जात होती. ही घटना घडली तेव्हा गोदामात 20 कामगार काम करत होते. यातील 12 जणांचा होरपळून झाला, तर दुकान मालकासह चार जण गंभीर जखमी झाले. नवीन असे दुकान मालकाचे नाव असून मृतांची आणि जखमींची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे बंगळुरू ग्रामीणचे एसपी मल्लिकार्जुन बालादंडी यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरुतील घटनेवर शोक व्यक्त केला आहे. फटाक्याच्या गोदामाला लागलेल्या आगीत होरपळून 12 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ऐकून दु:ख झाले. मी स्वत: घटनास्थळाची पाहणी करणार आहे, असेही सिद्धरामय्या यांनी म्हटले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.