Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ड्रीम 11 मध्ये कोट्यधीश झाला PSI, पण आता उडाली झोप; पोलीस दलाने केली कारवाई

ड्रीम 11 मध्ये कोट्यधीश झाला PSI, पण आता उडाली झोप; पोलीस दलाने केली कारवाई


पुणे, 18 ऑक्टोबर : ड्रीम 11 गेममध्ये दीड कोटी जिंकलेले पिंपरी चिंचवडचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्या अडचणीत वाढ झालीय. सोमनाथ झेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनॉयकुमार चोबे यांच्या आदेशानुसार गठित केलेल्या पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्या चौकशी समितीने ही कारवाई केली. ऑन ड्युटी असा खेळ खेळणे गैरवर्तणुकीची कृती असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, ड्रीम 11 या ऑनलाईन खेळावर काही राज्यात बंदी आहे, हा खेळ जोखमीचा असल्याने तो सट्टा ठरतो. पोलिस कर्मचारी किंवा अधिकारी यांचे आर्थिक उत्पंनाचे साधने कायदेशीर असावेत असा नियम आहे. याशिवाय कोणत्याही खेळ प्रकारात भाग घेताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते. ती परवानगी झेंडे यांनी घेतली नव्हती. विशेष म्हणजे ऑन ड्युटी असे खेळ खेळणे गैर वर्तनुकीची कृती असल्याचा ठपका देखील झेंडे यांच्यावर ठेवण्यात आल्याची माहिती मिळतेय.

दरम्यान, झेंडे यांच्याशी संवाद साधला असता आपण सुट्टीवर असल्यामुळे कारवाई बाबत माहिती नसल्याचे प्रतिक्रिया देता येणार नसल्याचं झेंडे म्हणाले. तर विभागीय चौकशीसाठी पुढील तपास डीसीपी बंगर यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती पोलिस दलातील जनसंपर्क अधिकारी सतीश माने यांनी दिलीय.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.