10 वी पास उमेदवारांसाठी टपाल जीवन विमा विभागात नोकरीची संधी, मुलाखतीद्वारे होणार निवड
जर तुम्ही सध्या नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. टपाल जीवन विमा, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.
येथे 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी आहे.
टपाल जीवन विमा, मुंबई अंतर्गत "अभिकर्ता" पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहाचे आहे. या पदांसाठी मुलाखतीची तारीख 16 ऑक्टोबर 2023 आहे.
भरती संबंधित सविस्तर माहिती : -
पदाचे नाव
वरील भरती अंतर्गत अभिकर्ता पदांची जागा भरली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना सविस्तर वाचावी.
नोकरी ठिकाण
लक्षात घ्या ही भरती मुंबई येथे होत आहे.
वयोमर्यादा
येथे अर्ज करण्यासाठी कमीत कमी १८ वर्षे व जास्तीत जास्त वयोमर्यादा नाही.
निवड प्रक्रिया
यासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
इच्छुक उमेदवार प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई उत्तर विभाग टपाल कार्यालय, नंदा पाटकर मार्ग, विलेपार्ले पूर्व, मुंबई - ४०००५७ या पत्त्यावर हजर राहू शकतात.
मुलाखतीची तारीख
येथे उ,उमेदवार 16 ऑक्टोबर 2023 या तारखेला हजर राहू शकतो.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.indiapost.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-वरील पदांकरीता उमेदवारांची निवड मुलाखत द्वारे होणार आहे.
-इच्छुक उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
-मुलाखतीस येताना आवश्यक कागदपत्रा सह हजर राहावे.
-वरील पदांसाठी मुलाखत 16 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात येईल.
-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.