चक्क 10 चाकी ट्रक चोरी केल्याप्रकरणी सांगलीच्या एकाला अटक
आलास येथून दहा चाकी ट्रक चोरी केल्याप्रकरणी एका चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले . राजाराम दऱ्याप्पा कांबळे (वय ३२, रा. इंदिरानगर सोन्याळ, ता. जत. जि सांगली. सध्या रा. नविन वसाहत इनामधामणी. ता. मिरज. जि सांगली) असे त्याचे नाव आहे.
चोरीची फिर्याद ट्रकचालक नारायण गोविंदराव हिवाळे (वय ३६, रा. औरंगाबाद रोड, वृंदावन नगर, नाशिक) याने कुरुंदवाड पोलिसांत दिली होती. आलास येथून शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास दहा चाकी ट्रक चोरीस गेला होता. फिर्यादीनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक सागर पवार यांनी तपासाची चक्रे गतिमान करत सोमवारी सकाळी गणेशवाडी गावच्या हद्दीत कातरकट्टी ते कागवाड रस्त्यावर संशयित आरोपी राजाराम कांबळेला अटक केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.