Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपाला किमान 10 वर्ष मुस्लिम मतांची गरज नाही, आसामचे मुख्यमंत्री हिमंत शर्मा यांची दर्पोक्ती

भाजपाला किमान 10 वर्ष मुस्लिम मतांची गरज नाही,  आसामचे मुख्यमंत्री हिमंत शर्मा यांची दर्पोक्ती 


भारतीय जनता पक्षाला किमान पुढील 10 वर्ष मुस्लिम मतांची गरज नाही, असे विधान आसाममधील भाजपा सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्म यांनी केले. यावेळी त्यांनी 'मियां मुस्लिम' विचारधारेचा पुनरुच्चारही केला. ते गुवाहाटीमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलत होते.

निवडणुका आल्या मी स्वत: त्यांना विनंती करेन की आम्हाला मतदान करू नका. जेव्हा तुम्ही कुटुंबनियोजनाचे पालन कराल, बालविवाहासारख्या प्रथा थांबवाल आणि कट्टरतावादाला आळा घालाल तेव्हा आम्हाला मतदान करा. आणि हे सर्व पूर्ण होण्यासाठी किमान 10 वर्ष लागतील. त्यामुळे आता नाही तर 10 वर्षांनी मुस्लिमांकडे मतं मागू, असे हिमंत बिस्वा शर्मा म्हणाले.

भाजपला मतदान करणाऱ्या मुस्लिमांना दोन-तीन पेक्षा जास्त मुलं नसावीत. त्यांनी मुलींना शाळेत पाठवावे, बालविवाह करू नये आणि कट्टरतावाद सोडून सुफी धर्म स्वीकारावा, असे आवाहनही त्यांनी केले. या अटींची पूर्तता झाल्यावर मी तुमच्याकडे मते मागायला चार चापोरी या मुस्लिमबहुल भागात येईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, याआधीही हिंमत बिस्वा शर्मा यांनी मुस्लिमांकडे मतं मागायला जाणार नाही असे म्हटले होते. सध्या तरी मला मुस्लिम मतांची गरज नाही. गेल्या वेळी मी त्यांच्या वस्त्यांत प्रचार केला नव्हता, आताही भाजप त्यांच्या भागात प्रचार करून मतं मागणार नाही, असे हिमंत बिस्वा शर्मा म्हणाले होते.

एकगठ्ठा मतांच्या राजकारणामुळेच सर्व प्रश्न निर्माण होतात. मी मुस्लिम वस्त्यांमध्ये जातो, त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहातो, त्यांना भेटतो. पण विकास आणि राजकारणाची मी सांगड घालत नाही. काँग्रेसने त्यांच्याशी जोडलेले संबंध हे केवळ मतांसाठी आहेत हे मुस्लिमांना कळायला हवं, असे शर्मा यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.