Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तामिळनाडूत फटाके कारखान्यात भीषण आग, अपघातात 10 जणांचा मृत्यू

तामिळनाडूत फटाके कारखान्यात भीषण आग, अपघातात 10 जणांचा मृत्यू

तामिळनाडूमधील अरियालूर जिल्ह्यातील व्ही विरागलूर गावात सोमवारी एका खाजगी फॅटाक्याच्या गोदाऊन मध्ये आग लागली.या स्फोटात तीन महिलांसह 10 जणांचा मृत्यू झाला.जिल्ह्यातील थिरुमनूर भागात ही घटना घडली. सोमवारी सकाळी हा अपघात झाला तेव्हा कारखान्यात 23 कामगार अडकले होते.या घटनेत अन्य 13 कामगार भाजले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी सांगितले की, युनिटमध्ये स्फोट झाल्यानंतर आग पसरली आणि आवारात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरसह अनेक वाहने जळून खाक झाली. “दीपम फायर वर्क्स या परवानाधारक फटाके गोदाऊव  युनिटमध्ये आग लागली,” अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तीन महिला आजच कामासाठी आल्या होत्या आणि त्यांच्यावर दुर्घटना झाली.अशी अधिकाऱ्यांनी माहिती माध्यमांना दिली.


स्फोट इतका भीषण होता की, काही क्षणांतच लोक जळून खाक झाले. अग्निशमन आणि बचाव सेवा कर्मचार्‍यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढले आणि 13 जणांना भाजल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटने अंतर्गत कारखान्याचे मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केले आहे.अथक प्रयत्नानंतर आग  आटोक्यात आली. आग विझवण्याचे शर्तीचे काम सुरु होते. जळलेले मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ₹ 3 लाख, गंभीर जखमींना प्रत्येकी ₹ 1-लाख आणि किरकोळ जखमींना ₹ 50,000 देण्याची घोषणा केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.