Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

102 कोटीच्या शेअरचे मालक आहोत हे साधेसुधे आजोबा ; बघा VIDEO

102 कोटीच्या शेअरचे मालक आहोत हे साधेसुधे आजोबा ; बघा   VIDEO 


शेअर बाजारानं अनेक गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवलं आहे. त्यात जोखीम भरपूर असली तरी परतावाही मोठा आहे. बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी त्यांच्या शेअरहोल्डर्सचा श्रीमंतांच्या यादीत समावेश केलाय. कोट्यवधींचे मालक असूनही काही लोक अतिशय साधेपणानं जीवन जगताना आपल्याला दिसतात.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक आजोबा आपल्याकडे १०२ कोटी रुपयांचे शेअर्स असल्याचा दावा करताना दिसतायत. एवढा पैसा असूनही अत्यंत साधेपणानं राहणाऱ्या त्या आजोबांच्या वागण्यानं आणि साध्या राहणीमानानं लोकांचं लक्ष वेधून घेतलंय. एवढा पैसा असूनही त्या आजोबांमध्ये जराही अहंकार दिसत नाही याचं लोक कौतुक करत आहेत.



या शेअर्सनं बनवलं कोट्यधीश

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरील कॉन्सेप्च्युअल इन्व्हेस्टर या अकाऊंटवरून त्या आजोबांचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. यामध्ये त्या आजोबांकडे किती शेअर्स आहेत आणि कोणत्या कंपनीचे शेअर्स आहेत, याबद्दल माहिती शेअर करण्यात आलीये. इतकंच नाही, तर ते आजोबा व्हिडीओमध्ये आपल्याकडे किती शेअर्स आहेत हे सांगताना दिसतायत. त्यांच्याकडे ८० कोटी रुपयांचे एल अँड टी शेअर्स, २१ कोटी रुपयांचे अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स, १ कोटी रुपयांचे कर्नाटक बँकेचे शेअर्स आहेत. असं असूनही ते आजोबा अत्यंत साधेपणानं जगत आहेत. सध्या या आजोबांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यांच्या व्हिडीओवर अनेक कमेंट्स आणि लाईक्सचाही वर्षाव होतोय. सर्वच युझर्सनं या आजोबांच्या साधेपणाचंही कौतुक केलंय.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.