Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

" वाघनखं शिवाजी महाराजांची आहेत की शिवकालीन ?" आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला मुद्दा

" वाघनखं शिवाजी महाराजांची आहेत की शिवकालीन ?" आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला मुद्दा 


मुंबई छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं महाराष्ट्रात आणली जात आहेत. मात्र वाघनखांवरुन आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रात येत असलेली वाघनखं शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत की शिवकालीन आहेत? याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी त्यांनी केली.

आदित्य ठाकरे म्हणाले की, इंग्लंडहून छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं येत आहेत. परंतु ही वाघनखं कायमस्वरुपी आपल्याकडे राहणार आहेत का? याबाबत प्रश्नच आहे. कारण ती वाघनखं केवळ तीन वर्षांसाठी आपल्याकडे राहतील, असंही जीआरमध्ये म्हटलं. मुळात ती शिवकालीन आहेत का? असा प्रश्न आदित्यंनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि इतर मंत्र्यांच्या विदेश दौऱ्याबद्दल आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून टीकास्र सोडलं. ते म्हणाले की, आम्ही प्रश्न विचारल्यानंतर 30 मिनिटांत मंत्रालयातून दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. आमच्या ट्विटनंतर दौरा रद्द करावा लागला, जनतेचा पैसा आम्ही वाचवला आहे. ये डर अच्छा हैं..

उदय समंतांच्या दौऱ्याबद्दल आदित्य ठाकरे म्हणाले, उद्योगमंत्र्यांचा हा तिसरा दौरा आहे. राऊंड टेबल कॉन्फरन्सला जातायत. परंतु कोणाला भेटणार कोणत्या कंपन्या येणार याबाबत काहीच स्पष्टता नाही. दाओसला जाऊन उद्योगमंत्री करणार काय ? चार महिने आधी जाऊन काय पाहणी करणार? जनेतच्या पैशाने तुम्ही का जाताय, स्वतःच्या पैशावर का जात नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

''जपान दौऱ्याचा आणखी एक जीआर निघाला होतं. उपमुख्यमंत्री यांना टोकिओमध्ये बोलवलं होतं. या दौऱ्याचा खर्च एमआयडीसीला उचलायचा होतं. मग उद्योगमंत्री का नव्हते गेले? या दौऱ्यात नेमकं काय झालं? उपसभापती महोदया या परदेशात 50 लोकांना घेऊन गेल्या.. काय अभ्यास केला?'' हे मुद्दे उपस्थित करुन त्यांनी सरकारच्या विदेश दौऱ्यावर संशय व्यक्त केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.