Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत भगवे वादळ ; मराठा समाजाचा भला मोठा मोर्चा

सांगलीत भगवे वादळ ; मराठा समाजाचा भला मोठा मोर्चा 


सागंली : मराठा समाजाला  50 टक्के ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. या प्रमुख मागणीसाठी आज सांगलीत 'मराठा क्रांती मोर्चा' निघाला. यासाठी सकाळी आठ वाजेपासूनच मराठा समाज क्रांतीसिंह नाना पाटील चौकात एकवटला. 'एक मराठा लाख मराठा' घोषणांनी परिसर दुमदुमला आहे.

सांगली, मिरज, कुपवाड शहरांच्या दिशेकडून जत्थे क्रांतीसिंह चौकात मराठा समाज एकत्र येत आहे. भगवे झेंडे, मी मराठा असलेल्या टोप्यांनी परिसर भगवामय झाला आहे. याठिकाणी मुलीदेखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात दाखल झाल्या आहेत. मागण्यांचे पोस्टर हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी होत आहे.

गायकवाड आयोगाच्या  शिफारसीनुसारच आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. याप्रकारच्या घोषणा देण्यात येत आहेत. मराठा समाजाला आरक्षण  मिळालेच पाहिजे, तसेच जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलिस लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 'मराठा मोर्चा-२' आज काढण्यात येत आहे.

विश्रामबाग येथील चौकात मोठ्या संख्येने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज तसेच लोकप्रतिनिधी दाखल होत आहेत. एक मराठा लाख मराठा, मी मराठा, भगवे ध्वज घेवून लोक मोर्चात सहभागी झाले आहेत. यामध्ये महिलांचीही संख्या लक्षणीय आहे. विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन आणि जिजामातांना वंदन करुन मोर्चाला सुरुवात होणार आहे.

या ठिकाणी मराठा क्रांतीची मशाल पेटवण्यात येईल. शहरी तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यातून मोर्चाला विविध मार्गावरून लोक येत आहेत. मोर्चातील लोकांसाठी पिण्याचे पाणी, बिस्किट पुडे, अल्पोपहाराची विविध मंडळ, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्थांनी सोय केली आहे.

जालना येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु असताना आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांवर अमानुष लाठीहल्ला करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ मराठा समाजाने ७ सप्टेंबरला सांगली जिल्हा बंद ठेवला होता. मराठा क्रांतीतर्फे २७ सप्टेंबर २०१६ रोजी अहमदनगर येथील कोपर्डीतील मुलीवरील अत्याचार तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी मुक मोर्चा काढला होता.

सामाजिक संघटनांचा पाठिंबा

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या या मोर्चाला सर्व पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर लिंगायत समाज, मुस्लिम समाज, जिल्हा केमिस्ट असोसिएशन, भारती विद्यापीठ, मराठा केमिस्ट संघटना आदी विविध सामाजिक संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्या बांधवांना मुस्लिम समाजाच्या वतीने पाणी वाटप करण्यात येणार आहे. लिंगायत समाजाकडून अल्पोपहाराचे वाटप केले जाईल.


केमिस्ट असोसिएशनकडून मोर्चानंतर स्वच्छता केली जात आहे. सिव्हिल चौक येथे अ‍ॅम्ब्युलन्स तयार ठेवल्या होत्या. ठिकठिकाणी स्वच्छतागृहांची तसेच मोर्चाच्या मार्गावर दोन्ही बाजूने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. विश्रामबाग चौकातून राम मंदिर चौकापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मार्गावर विश्रामबाग, गेस्ट हाऊस, मार्केट यार्ड, पुष्पराज चौक, राम मंदिर चौकात मोर्चाची सांगता आहे. रिमझिम पाऊस मोर्चाला सकाळी सुरुवात होण्यापूर्वी साडेनऊ वाजता दहा मिनिटे रिमझिम पावसाने हजेरी लावली. त्यांचा मोर्चावर काही परिमाण झाली नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.