Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सारी दुनियाका बोझ हम उठाते है...हमालांचा ड्रेस आणि डोक्यावर बॅग, राहुल गांधींचा वेगळाच अंदाज

सारी दुनियाका बोझ हम उठाते है...हमालांचा ड्रेस आणि डोक्यावर बॅग, राहुल गांधींचा वेगळाच अंदाज 


कॉग्रेस नेते राहुल गांधी सध्या सामान्य जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न ऐकत आहेत. भारत जोडो यात्रेमधून त्यांनी अनेक सामान्य जनतेशी संवाद साधला. अशात आता राहुल गांधी हमालाच्या गणवेशात दिसले आहेत. त्यांनी हमालांशी बातचीत करत त्यांचे प्रश्न समजून घेतलेत. राहुल गांधी कायमच त्यांच्या वक्तव्यांसह अनेक गोष्टींमुळे चर्चेचा विषय ठरतात.आज राहुल गांधी दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलवर पोहचले होते. येथे आल्यावर त्यांनी सर्व हमालांशी बातचीत केली. त्यांचे प्रश्न जाणून घेतले. इतकेच नाही तर राहुल गांधींनी हमालांना आपलेसे वाटावे म्हणून त्यांचा पोशाख परिधान केला. तसेच काही सामान देखील उचलले.

राहुल गांधी यांनी स्वत: त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. त्यांनी यावर काही फोटो शेअर केलेत. यातील एका फोटोत राहुल गांधी लाल रंगाचा हमालांचा पोशाख आणि डोक्यावर एक सुटकेस घेऊन जात आहेत. त्यांचा हा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या आधी राहुल गांधींनी ट्रकने केलेला प्रवास व्हायरल झाला होता. हमालांसोबत काढलेले फोटो व्हायरल झाल्यावर भाजप समर्थकांनी राहुल गांधींना ट्रोल केलं आहे. भाजप नेते तेजिंदर पल्लसिंग बग्गा, शेहजाद, आशिष सिंग यांनी राहुल गांधींच्या या फोटोंवर मीम्स शेअर केलेत. तसेच त्यांच्यावर टीका केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.