Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ओठांवरची लिपस्टिक कशी गायब झाली? नवरा-बायकोचा वाद, अन् पोलीसांना ताप

ओठांवरची लिपस्टिक कशी गायब झाली? नवरा-बायकोचा वाद, अन् पोलीसांना ताप


आग्रा येथील एक अनोखे प्रकरण व्हायरल झाले आहे. लिपस्टिकवरून एका दांम्पत्याचे इतके कडाक्याचे भांडण झाले की प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले. अखेर पोलिसांना समुपदेशन केंद्राची मदत घ्यावी लागली. शहीद नगर येथील एक तरुण सिकंदरा भागातील बुटांच्या कारखान्यात काम करतो. त्याचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये सर्व सुरळीत हो, ते पण अचानक दोघांमधील तणाव वाढला, तोही लिपस्टिकवरून. 

काही दिवसांपूर्वी पती कारखान्यातील नाइट ड्यूटी संपवून घरी आला. रात्री झोपण्यापूर्वी पत्नीने लिपस्टिक लावली होती. पण, सकाळी पत्नीच्या ओठांवरून लिपस्टिक गायब होती. त्यावरून पतीला पत्नीवर संशय आला आणि वाद इतका वाढला, की पत्नी माहेरी निघून गेली आणि पोलिसांत तक्रार केली. वादाचं कारण बघून पोलिसांनीही डोक्यालाच हात लावला. पत्नीने पोलिसांना सांगितले की, सकाळी ब्रश केल्यानंतर तोंड धुतल्यामुळे लिपस्टिक निघून गेली. पती प्रत्येक गोष्टीवरून संशय घेतो. लिपस्टिक गायब झाल्यामुळे मारहाणही केली, म्हणून पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी हे प्रकरण रविवारी कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठवले. तिथे समुपदेशकाने समजावल्यानंतर दोघे एकत्र राहण्यास तयार झाल्याचे समजते. तथापि, हे प्रकरण निवळले असले, तरी सोशल मीडियात मात्र चर्चेत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.