Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारुची नदी रस्त्यात, स्वत:ला वाचवण्यासाठी लोकांनी.

दारुची नदी रस्त्यात, स्वत:ला वाचवण्यासाठी लोकांनी.

मुंबई : पावसाळ्यात आपल्याला अनेकदा रस्त्यात पाणी साचल्याचं पाहायला मिळतं. त्याचबरोबर अतिवृष्टी झाल्यानंतर पाण्याचा मोठा लोढा सुध्दा जाताना पाहायला मिळतो. ग्रामीण भागात अशा पद्धतीचा पाऊस अनेकदा पाहायला मिळतो. ज्यावेळी ग्रामीण भागात मुसळधार पाऊस होतो. त्यावेळी असं चित्र पाहायला मिळतं. ज्या गोष्टीची आपल कल्पना सुध्दा करु शकत नाही, असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रेड वाईन एक मोठा लोढा रस्त्याने जात असल्याचा व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर अधिक चर्चा सुरु आहे.

दारुचा लोढा रस्त्यात


हा व्हिडीओ मागच्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओला अनेक कमेंट सु्ध्दा आल्या आहेत. हे सगळं प्रकरण पोर्तुगाल देशातील असल्याचं एका वेबसाईटनं म्हटलं आहे. ही घटना Sao Lourenco do Bairro या ठिकाणची आहे. रविवारी झालेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. रविवारी Levira Distillery च्या टाकी अचानक फुटल्या. त्यानंतर 22,00,000 लीटर रेड वाइन वाहून गेली आहे.

22 लाख लीटर रेड वाइन डोंगरातून निघून रस्त्यावर वाहू

त्या व्हिडीओत आपल्याला पाहायला मिळत आहे की, हजारो लीटर वाईन रस्त्यावर वाहून जात आहे. त्यावेळी तिथं ही घटना पाहणाऱ्या लोकांच्य डोळ्यात नक्की पाणी आलं असणार अशा अनेक कमेंट आल्या आहेत. रविवारी सायंकाळी ही घटना लेविरा डिस्टिलरी येथे घडली. 22 लाख लीटर रेड वाइन डोंगरातून निघून रस्त्यावर वाहू लागली. त्या वाईनचा स्पीड इतका होता की, तिथल्या लोकांनी या घटनेची माहिती तात्काळ प्रशासनाला दिली. सर्टिमा नदीत ती वाईक मिसळू नये यासाठी तिथल्या प्रशासनाने ताबडतोब बंदोबस्त केला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.