Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आभा हेल्थ कार्ड म्हणजे काय? एका क्लिकवर तुमच्या आरोग्याची माहिती समजणार

आभा हेल्थ कार्ड म्हणजे काय? एका क्लिकवर तुमच्या आरोग्याची माहिती समजणार 


कोविडनंतर सर्वांना उत्तम आरोग्याचे महत्त्व समजायला लागले आहे. सर्वजण स्वत: ची काळजी घेतात. आता यासंदर्भात सरकारने एक नवीन पाऊल उचललं आहे. सरकारने सर्व नागरिकांना आभा हेल्थ कार्ड बनवून घेण्याचे आवाहन केले आहे.

आभा हेल्थ कार्ड हे रुग्णाच्या आरोग्याची सर्व माहिती नोंदण्याचे एक कार्ड आहे. यामध्ये रुग्णाची सर्व माहिती नोंद केलेली असते. या कार्डद्वारे तुम्ही रुग्णाचा संपूर्ण इतिहास सहज शोधू शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची माहिती एका क्लिकवर समजेल.

आभा हेल्थ कार्ड म्हणजे काय ?

आभा म्हणजे 'आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट नंबर'. आभा हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे. ज्यात नागरिकांच्या आरोग्याची संपूर्ण माहिती असते. हे कार्ड आपल्या आधारकार्डसारखेच असेल. यावर आधार कार्डसारखा १४ अंकी नंबर असेल. या नंबरचा वापर करुन रुग्णाची संपूर्ण माहिती कळते.

कोणत्या व्यक्तीला काय आजार आहे? त्यावर कोणते औषधोपचार सुरू आहे? कोणत्या चाचण्या केल्या आहेत? कोणत्या रुग्णाला कोणत्या समस्या आहेत? तो कोणकोणत्या आरोग्य इन्शुरन्सशी जोडला गेला आहे? या सगळ्याची माहिती डिजिटल पद्धतीने साठवली जाते.



या कार्डवरील नंबर टाकून तुमच्या आरोग्याचा सर्व डेटा उपलब्ध होईन. याशिवाय तुम्ही हे कार्ड डिलीटदेखील करु शकता. विशेष म्हणजे, या कार्डमुळे रुग्णालयात जाताना तुम्हाला डॉक्टरांची कागदपत्रे किंवा गोळ्यांची माहिती घ्यायची गरज नाही. तुमच्या आभा नंबरवरुन आरोग्यविषक डेटा मिळवू शकता. त्यामुळे जुन्या टेस्टचे रिपोर्ट असतील तर नवीन टेस्ट करण्याची गरज भासणार नाही. यामुळे वेळ आणि पैसा वाचेल

आभा हेल्थ कार्ड कसे बनवावे?

आभा हेल्थ कार्ड तुम्ही सार्वजनिक, खासगी दवाखान्यात किंवा घरबसल्या ऑनलाईन बनवू शकता.

आभा हेल्थ कार्ड बनवायची प्रोसेस

सर्वप्रथम https://abdm.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या

यानंतर तिथे दिलेल्या आभा नंबरवर (Create ABHA Number) क्लिक करा.

आभा हेल्थ कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करु शकता.

आधार कार्ड वापरुन जर तुम्ही आभा कार्ड काढत असाल तर त्यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे असते. त्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा.

आधार नंबर टाकायचा. त्यानंतर दिलेल्या सुचना काळजीपूर्वक वाचा.

त्यानंतर तुम्हाला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहून नेक्स्ट वर क्लिक करा.

त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो तिथे टाकावा लागेल.

त्यानंतर तुमचे आधार व्हेरिफिकेशन होईल. नंतर नेक्स्ट वर क्लिक करा.

त्यानंतर नवीन पेज ओपन होईन. तिथे आधार कार्डशी लिंक असलेला मोबईल नंबर टाकावा.

तुम्ही तुमचा ई-मेलदेखील आभा कार्डशी जोडू शकता.

त्यानंतर तुमचा आभा नंबर क्लिक झाल्याची माहिती तुम्हाला दिसेल. त्याखाली तुमचा आभा नंबर लिहलेला असेल. त्यानंतर Link ABHA Address वर क्लिक करा.

त्यानंतर तुम्ही याआधी आभा अॅड्रेस तयार केलाय का असा प्रश्न विचारला जाईल. त्यावर नो टिक करायचं.

सुरवातीला तुमचे सर्व Profile Details दाखवले जातील. ते नीट वाचा. मग आभा अॅड्रेस तयार करा.

त्यानंतर तुमची माहिती भरुन आभा अॅड्रेस तयार करु शकता. हे सर्व झाल्यावर क्रिएट आणि लिंक वर क्लिक करा.

तुमचा आभा नंबर आणि आभा अॅड्रेस लिंक झाल्यावर तुम्हाला मेसेज येईन.

यानंतर तुम्ही पुन्हा लिंकवर जाऊन लॉग इन करा. त्यानंतर तुम्ही आभा कार्ड डाउनलोड करा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.