पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची अर्थव्यवस्थाच अंबानी, अदानीना विकायच ठरवलय; वंचितच्या सुजात आंबेडकरांचा घणाघात
सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भांडवलदार अदानी, अंबानी यांना देशाची अर्थव्यवस्थाच विकायचं चाललंय. विकासाच्या नावाखाली खासगी संस्थांच्या दावणीला देश बांधला जात आहे. सरकारी नोकऱ्यांतील कंत्राटीकरण त्याची सुरुवात आहे. त्याविरोधात लढा सुरूच राहील. सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत उचलून राज्याबाहेर फेकू, असा इशारा सुजात आंबेडकर यांनी येथे दिला.
शासकीय नोकऱ्यांचे खासगीकरण करणारा ६ सप्टेंबर २०२३ चा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यातील पहिलाच मोर्चा निघाला. त्यावेळी ते बोलत होते.
विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे जिल्हाध्यक्ष संजय विभूते, अभिजित पाटील, 'वंचित'चे जिल्हा प्रभारी संतोष सूर्यवंशी, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, युवक आघाडी राज्य उपाध्यक्ष इंद्रजित घाटे, जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, राजेश गायगवळे, महापालिका क्षेत्राध्यक्ष आनंदसागर पुजारी, जिल्हा महासचिव अलीसो मुलाणी, महिला आघाडीच्या क्रांतीताई सावंत आदी सहभागी झाले. आंबेडकर यांनी भाषणाची सुरुवात जय जिजाऊ, जय शिवराज, जय भीम अशी केली.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले, ''२०१४ पासून वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. दूरसंचार, एअर इंडियाचे खासगीकरण केले. वर्ग एक पासून सर्वच भरती कंत्राटी पद्धतीने होतील. रेल्वे, आरोग्य, समाजकल्याण अशा महत्त्वाच्या सरकारी विभागांच्या खासगीकरणाचा घाट घातला जात आहे. आयत्या संस्था भांडवलदारांच्या घशात घातल्या जात आहेत. त्या सरकारच्या मालकीच्या राहिल्या नाहीत, तर आरक्षणाला अर्थच राहणार नाही.पंतप्रधान मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था विकायचं ठरवलंय. अदानी, अंबानीच्या घशात संस्था घालण्यास विरोधच राहील. स्पर्धा परीक्षांतून युपीएससी, एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्यांना नोकरीद्वारे प्रशासकीय सेवेची दारे उघडण्यापूर्वीच बंद केली जात आहेत. सरकारी शाळा बंद करून खासगी शाळांना प्रोत्साहन दिले जात आहे. हे होण्यापूर्वीच येत्या निवडणुकीत आम्ही त्यांना राज्याबाहेर फेकू, असा इशाराही त्यांनी दिला. भरपावसात सभा सुजात आंबेडकर यांचे भाषण सुरू असताना पाऊस सुरू झाला. त्यांनी छत्री घेण्यास नकार दिला. दोन मिनिटांत सभाही संपवली. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
काँग्रेसने पवारांकडे लक्ष द्यावे
पत्रकारांशी बोलताना आंबेडकर म्हणाले की, वंचित आघाडीला भाजपची बी टीम म्हणण्यापेक्षा काँग्रेसने शरद पवार, अदानी भेटीकडे लक्ष द्यावे. मोर्चातील ठळक बाबी कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करण्याची घोषणा भीमशक्ती-शिवशक्तीचा विजय असो असेच राहिलो तर गुलाम होऊचे फलक झळकले खासगीकरण म्हणजे राजेशाही, हुकूमशाहीकडे वाटचाल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.