डॉक्टर आणि रुग्णामध्ये फ्री स्टाइल हाणामारी ; वेळेवर उपचार न केल्याचा आरोप
रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णावर वेळेवर योग्य उपचार न केल्याचा आरोप केल्याने अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुणालयात गोंधळ झाला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुणालयात रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये मारामारी होत असल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणी रुग्णाच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुणालयात डॉक्टर आणि रुग्णामध्ये तुफान मारामारी झाली. दारापूर येथील एक रुग्ण गुरुवारी सकाळी 9 च्या सुमारास रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र त्या रुग्णावर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कुठलाही उपचार केला नाही किंवा त्याला कोणत्याही प्रकारचे औषध दिले नाही असा आरोप कुटुंबियांवर केला. त्यानंतर विचारणा करायला गेलेल्या रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यात जोरदार राडा झाला. त्यानंतर या राड्याचे रूपांतर तुफान हाणामारीत झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रात्री रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या सगळ्या प्रकारानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी गडगेनगर पोलीस ठाण्यात डॉक्टर आणि रुग्णालयाविरोधात तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत पुढील कारवाई सुरु केली आहे. सध्या मारहाण केलेल्या रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले असून जखमी रुग्णांवर उपचार सुरू आहे. मात्र या सगळ्या घटनेमुळे रुग्णालयातील इतर रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.
सात रुग्ण औषंधाविना
"काम करता करता मी पडल्याने जखमी झालो होतो. जखमी झाल्यानंतर दहाच्या दरम्यान मी रुग्णालयात भरती झालो होतो. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने दीड वाजेपर्यंत मला असेच फिरवलं. दोन ते तीनच्या दरम्यान माझा एक्सरे काढण्यात आला. एक्सरे नंतर दोन्ही हात पायांना प्लास्टर बांधण्यात आले. पाच वाजेपर्यंत मला कोणतेही औषध दिलं गेलं नाही. एवढं सगळं झाल्यावर दोनदा सीटी स्कॅन करायला लावला. त्यानंतर घरच्यांनी याबाबत चौकशी केली. त्यानंतर डॉक्टरांनी घोळका करत घरच्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी मारत मारत आम्हाला गेटपर्यंत आणलं. याप्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आली आहे," असे जखमी रुग्णाने सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.