अर्धा ऑक्टोबर बँका बंद ,कर्मचाऱ्यांची दिवाळीच; अशा आहेत सुट्या
नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्यात १६ दिवस बँका बंद राहतील. यात सार्वजनिक सुट्या, रविवार आणि दुसरा व चौथा शनिवार यांचा समावेश आहे. ऑक्टोबरमधील ३१ दिवसांपैकी १६ दिवस सुट्यांत जाणार असल्यामुळे बँक ग्राहकांना आपल्या बँकिंगविषयक कामाचे नीट नियोजन करावे लागेल. विशेष म्हणजे, १ ऑक्टोबर रोजी रविवार, २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती असल्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच २ दिवस सुट्या आल्या आहेत.
अशा असतील सुट्ट्या२ ऑक्टो : गांधी जयंती (देशभर)१४ ऑक्टो: महालया (कोलकाता)१८ ऑक्टो : कटी बिहू (आसाम)२१ ऑक्टो : दुर्गा पूजा (त्रिपुरा, आसाम, मणिपूर व बंगाल)२३ ऑक्टो : दसरा/महानवमी (कर्नाटक, ओडिशा, तामिळडू, आसाम, आंध्र प्रदेश, केरळ, बिहार)२४ ऑक्टो : विजयादशमी/(आंध्र प्रदेश, मणिपूर वगळून सर्व राज्यांत)२५ ऑक्टो : दुर्गा पूजा (सिक्किम)२६ ऑक्टो : दुर्गा/विलय दिवस (सिक्किम, जम्मू-कश्मीर)२७ ऑक्टो : दुर्गा पूजा (सिक्किम)२८ ऑक्टो : लक्ष्मी पूजा ( बंगाल)३१ ऑक्टो : सरदार वल्लभभाई पटेल जयंती (गुजरात
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.