Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल 


शिवनंदन हॉस्पिटलमध्ये प्रसूतीवेळी डॉक्टर उपस्थित नसल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाल्याने या घटनेस डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा ठपका वैद्यकीय समितीने ठेवल्यानंतर बारामती शहर पोलिसांनी डॉ. तुषार गदादे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बारामती : शहरातील शिवनंदन हॉस्पिटलमध्ये प्रसूतीवेळी डॉक्टर उपस्थित नसल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाल्याने या घटनेस डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा ठपका वैद्यकीय समितीने ठेवल्यानंतर बारामती शहर पोलिसांनी डॉ. तुषार गदादे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


२२ डिसेंबर २०२२ रोजी बारामती शहरातील शिवनंदन हॉस्पिटलमधील डॉ तुषार गदादे यांच्याकडे प्रसूतीसाठी शहरातील गर्भवती महिलेला दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी संबंधित महिलेची प्रसूती ही साधारण पद्धतीने न होता सिजेरियन पद्धतीने करावे लागेल असे सांगितले आणि डॉक्टर दवाखान्यातून निघून गेले. मात्र त्यानंतर या महिलेस प्रसूतीच्या कळा आल्या, मात्र प्रत्यक्षात प्रसूतीवेळी बाळ गुदमरून बाळाचा मृत्यू झाला.


दरम्यान या प्रसूतीच्या वेळी डॉक्टर ही उपस्थित नव्हते, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी तक्रार बाळाच्या नातेवाईकांनी केली होती. या या प्रकरणाची तक्रार बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. तेव्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने तीन सदस्यांची समिती नेमून याचा चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. तेव्हापासून याची चौकशी सुरू होती. ३० ऑगस्ट २०२३ रोजी तीन सदस्यीय समितीचा अहवाल आल्यानंतर या अहवालामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. त्या अहवालामध्ये असेही म्हटले आहे की ज्या परिचारिकेने या गर्भवती महिलेची तपासणी केली, तसेच तिच्यावर उपचार केले, ती परिचारिका देखील प्रसूती शास्त्रातील शैक्षणिक अर्थ प्राप्त परिचारिका नव्हती. त्यामुळे डॉ. तुषार गदादे यांच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.