Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जत - गिरगाव खून प्रकरणातील फरारी आरोपी गजाआड; उमदी पोलिसांची कारवाई

जत - गिरगाव खून प्रकरणातील फरारी आरोपी गजाआड; उमदी पोलिसांची कारवाई 


गेल्या आठ महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत असलेला गिरगाव खून प्रकरणातील संशयित आरोपीस अटक करण्याची कारवाई उमदी पोलिस ठाण्याचे तपासी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी केली आहे. दत्ता यलापा बजंत्री (रा. कुंभार गल्ली ,विजयपूर ता, जि. विजयपूर रा. कर्नाटक) असे खून प्रकरणातील अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी बजंत्री यास अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गिरगाव येथे २७ जानेवारी २०२३ रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सुखदेव साबू ब्याळकुळी यांच्या घरासमोर महादेव आप्पा राजशेखर हिरेमठ (रा. विजयपूर ता. विजयपूर) यांचा धारदार शस्त्राने खुन केला होता. याबाबत उमदी पोलिसात मयत हिरेमठ यांचा भाऊ प्रशांत चंद्रकांत हिरेमठ यांनी फिर्याद दिली होती. यानुसार पोलिसांनी दत्ता बजत्री यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु आरोपी हा कर्नाटकातील असल्याने पोलिसांना तपास करताना अडचणी येत होत्या परंतु पोलिसांनी कसून तपास करत बजंत्री यास गजाआड केले आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप ( सनी) शिंदे करत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.