सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात वाढ आणि पगारवाढ कोणत्या दिवशी मिळणार वाचा...
देशात सणासुदीचा हंगाम सुरू झाला असून सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. देशातील कोट्यवधी सरकारी कर्मचारी आता त्यांच्या महागाई भत्त्यात म्हणजेच डीएमध्ये वाढ होण्याची वाट पाहत आहेत. यासंबंधी एक अशी बातमी समोर आली आहे ज्यामुळे सरकारी कर्मचारी खूश होऊ शकतात. सरकारी नोकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच महागाई भत्त्यात वाढीची भेट मिळू शकते.
केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ कधी जाहीर करणार?
केंद्र सरकार येत्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच नवरात्रीपूर्वी महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ जाहीर करू शकते. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक जुलैपासून महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा ऑक्टोबरचा पगार वाढीव महागाई भत्ता (डीए) आणि थकबाकीसह येण्याची शक्यता आहे.
महागाई भत्त्यात सुधारणा कशी होते?
महागाई भत्त्यात दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये दोनवेळा सुधारणा केली जाते. सध्या केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ४२ टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. त्यात लवकरच 3 टक्क्यांनी वाढ झाली तर ती 45 टक्क्यांपर्यंत वाढेल.
महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता
महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय १ जुलैपासून लागू होणार असून महागाई भत्त्यात वाढीसह ऑक्टोबर महिन्याचे वेतन मिळणार आहे. ऑक्टोबर च्या पगारासह जुलै ते सप्टेंबर पर्यंतची थकबाकीही मिळू शकते. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.
डीएची गणना कोणत्या सूत्राच्या आधारे केली जाते?
केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता मोजण्याचा एक निश्चित फॉर्म्युला आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ताज्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (सीपीआय-आयडब्ल्यू) आधारे मोजला जातो. या सूत्राच्या आधारे महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत वाढ केली जाते. जुलैच्या सीपीआयच्या आकडेवारीनुसार, सरकार डीएमध्ये 3 टक्के वाढ करू शकते.महागाई भत्त्याची गणना औद्योगिक कामगारांच्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे केली जाते, जी कामगार ब्युरोकडून दर महिन्याला जारी केली जाते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ अपेक्षित आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महागाई भत्त्यात 3 टक्के आणि एकूणच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 45 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.