Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरजेच्या शासकीय रुग्णालयातील खाटेवर चक्क कुत्रे काढतात झोपा! रोहीत पवारांनी शेअर केला फोटो

मिरजेच्या शासकीय रुग्णालयातील खाटेवर चक्क कुत्रे काढतात झोपा! रोहीत पवारांनी शेअर केला फोटो 


मिरज : मिरज येथील शासकीय रूग्णालयातील खाटांवर चक्क कुत्रे झोपा काढत असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं असून आमदार रोहित पवार यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी काल राष्ट्रीय पातळीवरील वृत्तपत्रात आरोग्यविभागाच्या योजनांची जाहिरात दिल्यावरूनही त्यांनी निशाणा साधत सवाल केला आहे. रोहित पवार यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये रूग्णालयातील रूग्णांना उपचार घेण्यासाठी ठेवलेल्या खाटांवर चक्क तीन कुत्रे झोपलेले दिसत आहेत. कार्यकर्त्यांनी हे फोटो पाठवले असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. हे फोटो सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

काय म्हणाले आमदार रोहित पवार?

"एका कार्यकर्त्याने पाठवलेला मिरज शासकीय रुग्णालयाचा हा फोटो आहे. येथे कदाचित माणसांसोबत पाळीव प्राण्यांचा पण उपचार केला जात असावा. ही अभिनव योजना कालच्या जाहिरातीमध्ये देण्यास आरोग्यमंत्री विसरले असतील. या योजनेसाठी आरोग्यमंत्र्यांना जागतिक आरोग्य संघटनेचा पुरस्कार नक्कीच प्राप्त होईल, शासनाने केवळ आरोग्यमंत्र्यांचे नामांकन करायला हवे."

"स्वत:च्या प्रसिद्धीसाठी उधळपट्टी करायला सरकारकडे पैसे आहेत पण माझ्या मतदारसंघात ४०% काम पूर्ण झालेल्या शासकीय दवाखान्यासाठी तसेच राज्यातल्या इतर भागात आरोग्यसेवा देण्यासाठी शासनाकडे निधी पैसे नाहीत. अशा गलथान कारभाराला आता #THE_RISE_OF_HEALTHY_MAHARASHTRA म्हणायचे का?" अशी सणसणीत पोस्ट करत पवार यांनी आरोग्यमंत्र्यांच्या कामावर निशाणा साधला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.