सागंली; नांदण्यास येत नाही म्हणून विवाहित तरुणीला विषारी औषध पाजून मारण्याचा प्रयत्न
नंदण्यास येत नाही या कारणावरून विवाहित तरूणीला बळजबरीने विषारी औषध पाजून मारण्याचा प्रयत्न बेडग ता. मिरज येथे घडला. या प्रकरणी तरूणीच्या तक्रारीनुसार पती, सासरा व सासू विरूध्द शुक्रवारी रात्री उशिरा मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेडग माहेर असलेल्या शुभांगी ओमासे (वय २१) या तरूणीचे गावातीलच ऋषीकेश ओमासे यांच्याशी विवाह झाला आहे. काही महिन्यापुर्वी सासरच्या लोकांशी झालेल्या वादावादीमुळे खाडे वस्तीवरील माहेरी आल्या होत्या.
शुक्रवारी दुपारी माहेरच्या घरात घुसून पती, सासू व सासरा आणि अन्य एक जण अशा चौघांनी सासरी नांदण्यास का येत नाही या कारणावरून वाद केला. या वादावेळी शिवीगाळ करीत लाथाबुयययाने मारहाणही केली. याचवेळी तिघांनी दाबून धरून पतीने गळा दाबत जबरदस्तीने विषारी औषध पाजण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर तरूणीला माहेरच्या लोकांनी तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पती ऋषीकेश ओमासे, सासू सुमन ओमासे, सासरा श्रीकांत ओमासे व कृष्णा ओमासे या चौघाविरूध्द खूनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.