Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आरबीआय मध्ये नोकरीची संधी, मिळणार मोठा पगार; असा करा नोकरीसाठी अर्ज

आरबीआय मध्ये नोकरीची संधी, मिळणार मोठा पगार; असा करा नोकरीसाठी अर्ज 


सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सहायक पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर तरुण या पदासाठी अर्ज करू शकतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भरती प्रक्रिया सुरु केल्याने तरुणांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सहायक पदाच्या नोकरीसाठी अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०२३ असणार आहे. या तारखेनंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. ही भरती एकूण ४५० सहायक पदासाठी असणार आहे. आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहायक पदासाठी ऑनलाइन पूर्व परीक्षा ही २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. तर मुख्य परीक्षा ही २ डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान,परीक्षांच्या तारेखत बदल करण्यात येऊ शकतात असं बोललं जात आहे. मात्र, आरबीआयने दिलेल्या तारखेत परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे.

वयाची अट काय?

सहायक पदासाठी उमेदवार हा १ सप्टेंबर २०२३ रोजी २० वर्षांचा असावा. तसेच ही परीक्षा २८ पेक्षा अधिक वय असणाऱ्या तरुणांना देता येणार नाही. याचबरोबर आरक्षित जागेवरून अर्ज करणाऱ्या तरुणांना वयात सूट देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी इच्छुक आणि उमेदवारांसाठी भरती प्रक्रियाबाबत सविस्तर माहिती आरबीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.



शैक्षणिक पात्रता काय?

आरबीआयच्या सहायक पदासाठी उमेदवार हा कोणत्याही एका शाखेचा पदवीधर असावा. तसेच त्याला पदवी परीक्षेत ५० टक्क्यांपर्यंत गुण मिळालेले पाहिजे. याचबरोबर एसी,एसटी आणि दिव्यांग वर्गासाठी पदवी परीक्षेतील गुणाची अट नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.