Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नाकाबंदी वेळी मोटारीने धडक दिलेल्या पोलीस निरीक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू

नाकाबंदी वेळी मोटारीने धडक दिलेल्या पोलीस निरीक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू 


अंकली (ता. मिरज) येथे पंधरवड्यापूर्वी पोलिसांनी सुरू केलेल्या नाकाबंदीवेळी कारने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या श्रेणी उपनिरीक्षकाचा उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झा रामराव गोविंदराव पाटील (वय ५५, मूळ रा. डोंगरसोनी ता. तासगाव) असे अधिकाऱ्याचे नाव आहे.

गुरूवार दि. १४ रोजी अमावस्या असल्याने सांगली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अंकली फाटा येथे नाकाबंदी लावली होती. तेथे जखमी पाटील यांच्यासह इतर पोलिसांचे पथक वाहनांची तपासणी करत होते. रात्री पावणे एकच्या सुमारास मिरजेकडून एक मोटार (एमएच ४२ बीजे ४६९३) भरधाव तिथे आली. पोलिस पथकाने या वाहनचालकाला थांबवण्याचा इशारा केला. त्यातच या चौकातील वळण वाहनचालकाच्या लक्षात न आल्याने त्याने रस्त्यावर थांबलेल्या पाटील यांना जोरदार धडक दिली.

यात गंभीर जखमी झालेल्या उपनिरीक्षक पाटील यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचे निधन झाले. पाटील यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस दलातील सर्व अधिकारी उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.