पत्रकारांना दारू,धाब्यावर जेवण देणाऱ्या भाजपचे अध्यक्ष बावनकुळे यांना देशी दारूच्या बाटल्या भेट देणार ;राज्य प्रवक्ते संतोष पाटील
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना रात्री नेऊन चहा (दारू)धाब्यावर नेऊन रात्रीचे जेवण द्या असे उद्गगार काढले होते. यावर मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रका मध्ये म्हणाले आहेत की महाराष्ट्रातील लोक सभेच्या 40 जागा या महाविकास आघाडी जिंकणार हे एक्झिट पोलने दिलेल्या आकडेवारीनुसार माहिती दिली आहे.तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचे भाजपचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बावनकुळे राहिले नसून 52 वेळा खुळे झालेले दिसत आहे,कारण महाराष्ट्र मध्ये लोकसभेच्या त्यांच्या फक्त आठ जागाच निवडून येणार.
हे एक्झिट पोल मध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार सांगितले आहे. तेव्हापासून चंद्रशेखर बावनकुळे हे आपलं पद राहणार की जाणार या चिंतेमध्ये आहे त्यामुळे जेव्हा माणूस चिंतेत असतो त्यावेळेला त्यांच्या तोंडातून अशीकाही तरी बेताल वक्तव्य जातात,म्हणून त्यांनी पत्रकारांना आपली बाजू मांडण्यासाठी रात्रीच्या वेळेला चहा (दारू) मटणाचे जेवण धाब्यावरती द्यावे म्हणजे ते आपल्या बाजू मांडत राहतील असं त्यांना वाटू लागले आहे म्हणून हे वक्तव्य केले आहे यावरून भाजपच्या नेत्यांची धाबागिरी समोर येऊ लागले आहे,परंतु यावर आम्ही मराठा स्वराज्य संघाच्या वतीने चंद्रशेखर बावनकुळे यांना देशी दारूच्या बाटल्या भेट देणार आहे जेणेकरून तुम्ही त्या डोसल्यानंतर तुम्हाला शांत झोप येईल असे वक्तव्य दिलेल्या प्रसिद्ध पत्रक मध्ये मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी केले आहे .
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.