Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जप्त मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे देण्यास डीएसके यांचा विरोध

जप्त मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे देण्यास डीएसके यांचा विरोध 


पुणे:  गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्या भागीदारी कंपन्यांच्या मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करण्यास डीएसके यांनी विरोध केला आहे. ठेवीदारांकडून करण्यात आलेला अर्ज कायद्याच्या नजरेत सक्षम नाही. त्यामुळे तो फेटाळण्यात यावा, असे लेखी म्हणणे डीएसके यांच्या वकिलाने न्यायालयात सादर केले आहे.

डीएसके यांच्या आतापर्यंत 335 स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्याशी संबंधित विविध कंपन्या व खासगी वापराची 46 वाहने देखील पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यातील 13 वाहनांचा लिलाव केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने मुंबई उच्च न्यायालयात नुकतेच दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. जप्त करण्यात आलेल्या एकूण मालमत्तेपैकी 71 मालमत्ता या डीएसके यांच्या भागीदारी कंपन्यांच्या आहेत. त्यांचा लिलाव केला तर ठेवीदारांचे पैसे परत करता येवू शकता, एवढे पैसे मिळतील.

त्यामुळे या मालमत्तांचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे परत करावे, अशी मागणी मुंबईतील आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) न्यायालयात ठेवीदारांकडून ऍड. चंद्रकांत बिडकर यांनी केली आहे. ठेवीदारांचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत जप्त करण्यात आलेल्या कोणत्याही मालमत्ता एमपीआयडी कायद्यातील कलम सातनुसार मुक्त करण्यात येवू नये, असे या अर्जात नमूद आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.