Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोटरसायकलच्या धडकेत एकाचा नाहक बळी

मोटरसायकलच्या धडकेत एकाचा नाहक बळी 


जत : उमराणी (ता .जत) येथे एकाने हलगर्जीपणाने मोटरसायकल चालविल्याने एकाचा बळी गेला आहे. मुरलीधर भाऊसाहेब घारगे (व. ३०) (रा. उमराणी) असे मोटरसायकलच्या धडकेत ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मयत मुरलीधरचा चुलत भाऊ बापूसाहेब जगन्नाथ घारगे यांच्यावर जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सदरची घटना सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबतची फिर्याद पांडुरंग तानाजी घारगे यांनी जत पोलिसात दिली आहे.

जत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपी बापूसाहेब घारगे हे मोटरसायकलवरून भरधाव वेगाने, वाहतुकीचे नियमाचे पालन न करता चुकीच्या बाजूने चालवत होते. दरम्यान, आरोपी बापूसाहेब यांचा चुलत भाऊ मयत मुरलीधर घारगे हे त्यांच्या स्वतःच्या मोटरसायकलवरून उमराणी गावातून घारगे वस्तीकडे जात होते. यावेळी संशयित आरोपी बापूसाहेब घारगे यांच्या मोटरसायकलने जोराची धडक दिल्याने मुरलीधर घारगे मयत झाले आहेत. याबाबत त्यांच्यावर बेकायदेशीर व हलगर्जीपणाने मोटरसायकल चालविल्याने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.