Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

म्हैसाळ गणेशवाडीची पुनरावृत्तीची भीती? अघोरी कृत्याचा प्रकार उघड, सांगलीतील मांत्रिकासह काहीजण पोलिसांच्या ताब्यात

म्हैसाळ गणेशवाडीची पुनरावृत्तीची भीती? अघोरी कृत्याचा प्रकार उघड, सांगलीतील मांत्रिकासह काहीजण पोलिसांच्या ताब्यात

 

शिरोळ :  शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथे म्हैसाळ (ता. मिरज) येथील हत्याकांडासारखी पुनरावृत्ती झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. येथील स्मशानभूमीत शुक्रवारी रात्री अघोरी कृत्ये केल्याचा प्रकार गावातील जागरूक तरूणांमुळे उघडकीस आला आहे. याची माहिती मिळताच कुरूंदवाड पोलिसांनी मांत्रिकासह काहीजणांना ताब्यात घेतले आहे. 

गणेशवाडी येथील स्मशानभूमीत पौर्णिमेच्या रात्री सातच्या सुमारास अंगाला अंगारा लावून एका मांत्रिकासह सांगली जिल्ह्यातील 14-15 जणांनी यज्ञ पेटवल्याचे निदर्शनास आले. तीन तास यज्ञ करून इच्छित विधी झाल्यानंतर ती मंडळी निघाली. यावेळी गावातील काही जागरूक युवकांचे लक्ष त्यांच्याकडे गेले यावेळी युवकांनी त्यांना हे काय केला असे विचारल्यास त्यांच्या बोलण्यातून हा सर्व अघोरी कृत्याचा प्रकार उघडकीस आला.      

युवकांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे लिंबू, हळद, कुंकू, दोरा, नारळ आदि साहित्य सापडले. त्यानंतर गावकऱ्यांनी याची माहिती कुरूंदवाड पोलिसांना दिली. यावेळी मांत्रिकसह अन्य काहींना  कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काही महिन्यांपूर्वी सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे भोंदू बाबाने एकाच कुटुंबातील नऊ जणांचा बळी घेतला होता. गुप्तधनाच्या लालसेने ही घटना घडली होती. हे प्रकरण ताजे असताना सांगली जिल्ह्यातीलच एका मांत्रिकासह 14 जणांनी गणेशवाडीतील स्मशानभूमीत अघोरी कृत्य केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.