Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी ! महागाई भत्त्यासह मिळणार प्रमोशन, सरकारची मोठी घोषणा




केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ करू शकते. काही दिवसांपूर्वी हा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

यासोबतच कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. महागाई भत्ता वाढण्यासोबतच सातव्या वेतन आयोगाअंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना आणि संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांचे प्रमोशन होणार आहे.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण नागरी कर्मचाऱ्यांसाठी हे प्रमोशन जाहीर करण्यात आलं आहे. यात सर्व्हिस कालावधीतही बदल करण्यात आला आहे. मात्र फक्त पात्र कर्मचाऱ्यांनाच प्रमोशन दिलं जाणार आहे.

प्रमोशनसाठी इतक्या वर्षांची सर्व्हिस असणे आवश्यक

कर्मचाऱ्यांना प्रमोशनबाबत मंत्रालयाकडून एक सूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यात वेगवेगळ्या स्तरांसाठी वेगवेगळा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. लेव्हल १ ते २ साठी तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

लेव्हल १ ते ३ साठी तीन वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. तर लेव्हल २ ते ४ साठी ३ ते ८ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच लेव्हल १७पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना १ ते १२ वर्षांचा अनुभव असल्यास प्रमोशन मिळेल
लेव्हलनुसार ठरवण्यात आले निकष

प्रत्येक लेव्हलसाठी प्रमोशनचे वेगवेगळे निकष ठरवण्यात आले आहेत. याशिवाय ग्रेडनुसार यादी शेअर करण्यात आली आहे. या यादीच्या आधारे कर्मचाऱ्यांना प्रमोशन मिळणार आहे. संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हे नवीन अपडेट तत्काळ लागू करण्यात येणार आहे. या पात्रतेनुसार तत्काळ प्रमोशन दिले जाणार आहे. मात्र, कोणत्या पदासाठी प्रमोशन करण्यात येणार आहे. याबाबत अद्याप मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले नाही.

केंद्र सरकार लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देऊ शकते. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या मत्रिमंडळाच्या बैठकीत याची घोषणा केली जाऊ शकते. याचा फायदा सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. यावर्षी सरकारकडून दुसऱ्यांदा महाभाई भत्ता जाहीर केला जाणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.