पांढरेवाडीत बेकायदा वाळू उपसा, तिघांवर गुन्हा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, उमदी पोलिसांची कारवाई
जत : जत तालुक्यातील उमदी येथील पांढरेवाडी येथे नदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या तिघांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून एक ट्रॅक्टर, एक ट्रॉली व वाळू असा पाच लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उमदी पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली.
मल्हारी करपे, प्रकाश करपे (दोघे रा. पांढरेवाडी), सुरेश कोळी (रा. संख) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचे आदेश उमदीचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिले आहेत. शनिवारी पांढरेवाडी येथील नदी पात्रातून काहीजण बेकायदा वाळू उपसा करत असल्याची माहिती शिंदे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी पथक पाठवले.
पांढरेवाडी येथे पथक पोहोचल्यानंतर नदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी पथकाने एक ट्रॅक्टर, एक ट्रॉली व वाळू असा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमदीचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कपील काळेल, श्री. पोटभरे, श्री. चौगुले, सुदर्शन खोत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.