Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सोलापुरात मराठा समाज आक्रमक; सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग केला बंद

सोलापुरात मराठा समाज आक्रमक; सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग केला बंद


सोलापूर :  मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेचा निषेध म्हणून सोलापुरातील मराठा समाजाने ठिकठिकाणी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी सकाळी सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर समाज बांधवांनी रस्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेध केला.

अंबड जालना येथील मराठा समाजातील महिला, लहान मुला-मुली यांच्यावरील झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत व सरकारच्या लाठी चार्ज विरोधात आंदोलन करण्यात आले. याचवेळी आंदोलनकर्त्यांनी शिंदे- फडवणीस - पवार सरकारचा निषेध केला. दरम्यान, अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.