Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्करोग ओळखण्यासाठी कोणत्या टेस्ट आहेत महत्वाच्या? जाणून घ्या

कर्करोग ओळखण्यासाठी कोणत्या टेस्ट आहेत महत्वाच्या? जाणून घ्या 


कॅन्सर हा एक गुंतागुंतीचा रोग असून तो खूप घातक आहे आणि पेशींची अनियंत्रित वाढ हे त्याचे वैशिष्ट्य आहे. कॅन्सरच्या चाचण्यांमुळे रोग झाल्याचे लवकर लक्षात येऊन त्यावर लवकर उपाय सुरू करणे शक्य होते.

स्तनाच्या कॅन्सरचे निदान करण्यासाठी मॅमोग्राम ही सर्वात मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी स्क्रीनिंग पद्धत आहे, ज्यामध्ये स्तनाच्या ऊतींमध्ये काही दोष आहेत का याचे परीक्षण केले जाते. गर्भाशयच्या कॅन्सरच्या निदाना साठी पॅप टेस्ट फार महत्वाची आहे यामध्ये गर्भाशयाच्या पेशींमधील दोष लक्षात येतात. कोलोरेक्टल कॅन्सरसाठी कोलोनोस्कोपीज अत्यावश्यक आहेत, यामध्ये पॉलीप्स किंवा ट्यूमरसाठी मोठे आतडे तपासले जातात. पीएसए टेस्ट मध्ये रक्तातील प्रोस्टेट-स्पेसिफीक अॅंटीजेन पातळी तपासली जाते ज्यामुळे प्रोस्टेटचा कॅन्सर शोधण्यात मदत होते. याव्यतिरिक्त, बायोप्सी ज्यामध्ये तपशीलवार तपासणीसाठी ऊतींचे नमुने घेतले जातात ज्यामुळे विविध प्रकारच्या कॅन्सरचे निदान करता येते नियमित तपासणी. केल्याने रोगाचे वेळीच निदान होऊन लवकर उपचार करणे शक्य होऊन आजारमुक्त होण्याची शक्यता वाढते. याबद्दल अधिक जाणून घेऊयात न्यूबर्ग अजय शहा प्रयोगशाळा व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शहाबद्दल...

कॅन्सरचे निदान करण्यासाठी असलेल्या काही चाचण्या :-

मॅमोग्राम: स्तनाच्या कॅन्सरचे निदान करण्यासाठी केली जाणारी तपासणी, मॅमोग्राम मध्ये स्तनाच्या उतीतील दोष शोधण्यासाठी एक्स-रे काढण्यात येतात.

कोलोनोस्कोपी: यामध्ये कोलोरेक्टल कॅन्सरची लक्षणे पाहण्यासाठी मोठ्या आतड्याची तपासणी केली जाते. यामध्ये आढळून आल्यास पॉलिप्स काढून टाकता येतात.

पीएसए टेस्ट: ही प्रोस्टेट कॅन्सर तपासण्यासाठी असलेली रक्ताची चाचणी आहे. यामध्ये रक्तातील प्रोस्टेट-स्पेसिफीक अँन्टीजेन पातळी तपासली जाते

बायोप्सी: साधरणतः कॅन्सर झाला आहे का याची खात्री करण्यासाठी करण्यात येणारी तपासणी, बायोप्सी मध्ये उतीच्या नमून्याचे सूक्ष्मदर्शका द्वारे निरीक्षण केले जाते.

सीटी स्कॅन: कॉम्प्यूटेड टोमोग्राफी स्कॅन ज्यामध्ये शरीराच्या क्रॉस-सेक्शनल प्रतिमा घेतल्या जातात, याचा वापर विविध प्रकारच्या कॅन्सरच्या निदानासाठी केला जातो

एमआरआय स्कॅन: मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग, मेंदू, स्तन आणि मस्क्यूकोस्केलेटल सिस्टीम सारख्या मऊ उतींचे इमेजिंग करून, कॅन्सर शोधण्यासाठी उपयुक्त आहे.

रक्ताच्या चाचण्या: या चाचण्यांचा वापर करून रक्तातील ट्यूमर मार्कर्स किंवा कॅन्सरशी संबधित विशिष्ट पदार्थांचे प्रमाण पाहता येते, जसे गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी सीए-१२५

त्वचा तपासणी: त्वचारोगतज्ञ, त्वचेच्या कॅन्सरची शक्यता दाखविणारे त्वचेतील बदल किंवा त्वचेवरील तीळ यांची तपासणी करायला सांगतात

पीईटी स्कॅन: पॉझिट्रॉन एमीशन टोमोग्राफी स्कॅन, यामध्ये कॅन्सरच्या पेशींची चयापचय क्रिया शोधता येते आणि याचा वापर बहुतेकदा कॅन्सर किती प्रमाणात पसरला आहे हे पाहण्यासाठी केला जातो.

एंडोस्कोपी: यामध्ये कॅमेरा लावलेल्या एका लवचिक ट्यूबद्वारे पचनसंस्था, श्वसनसंस्था किंवा इतर भागात कॅन्सरची चिन्हे आहेत का हे तपासले जाते.

बोन स्कॅन: हाडांमध्ये पसरलेला कॅन्सर शोधण्यासाठी बोन स्कॅनचा वापर केला जातो.

लक्षात ठेवा, कॅन्सर संबधित तपासण्या या वय, लिंग, कुटुंबाचा आरोग्य इतिहास आणि जोखीम घटक यानुसार बदलतात. तुम्हाला कोणत्या चाचण्या करणे आवश्यक आहे याबाबत तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करणे आवश्यक आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.