Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डॉ.बाबासाहेब आंबेडकरावर आधारित सिनेमात गौरव मोरे साकारणार महत्वाची भूमिका

डॉ.बाबासाहेब आंबेडकरावर आधारित सिनेमात गौरव मोरे साकारणार महत्वाची भूमिका 


गौरव मोरे हा महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये विविध व्यक्तिरेखा साकारत असतो. गौरव मोरेने गेली अनेक वर्ष महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या माध्यमातुन प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन गौरवला एकामागोमाग एक अनेक हिंदी, मराठी सिनेमांची लॉटरी लागली आहे. गौरवला आता आणखी एक मराठी सिनेमा मिळाला आहे. हा सिनेमा म्हणजे परिनिर्वाण.

परिनिर्वाण सिनेमात गौरव मोरे साकारणार ही भूमिका

परिनिर्वाण सिनेमाची काही दिवसांपुर्वी घोषणा झाली. या सिनेमात गौरव श्यामराव ही भूमिका साकारतोय. गौरवने परिनिर्वाण सिनेमाची स्क्रिप्ट शेअर केलीय. ही स्क्रीप्ट शेअर करुन गौरव मोरे लिहीतो.. एक नवीन सुरुवात असं कॅप्शन दिलंय. अशाप्रकारे बाबासाहेब आंबेडकरांवर आधारीत परिनिर्वाण सिनेमात गौरव झळकणार आहे. या सिनेमात प्रसाद ओक प्रमुख भुमिका साकारणार आहे.



परिनिर्वाण सिनेमाची घोषणा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनावर आधारित 'परिनिर्वाण' चित्रपट येणार असल्याची बरीच चर्चा होती. अखेर त्याची घोषणा झाली आहे. नुकतेच या चित्रपटाच्या मोशन पोस्टर अनावरण करण्यात आले. यावेळी अभिनेता प्रसाद ओक देखील उपस्थित होता. तो कोणती भूमिका साकारणार याची सर्वांनाच उत्कंठा होती आणि अखेर ते जाहीर झाले आहे. या चित्रपटात प्रसाद ओक नामदेव व्हटकर यांची भूमिका साकारणार आहे.

काय असणार परिनिर्वाण सिनेमाची कथा?

६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे निर्वाण झाले. त्यावेळी लाखो जनता रस्त्यावर उतरली. देशाचा श्वास रोखून धरणारा हा क्षण नामदेव व्हटकर यांनी चित्रित केला. जवळपास ३००० फुटांची रिळ व्हटकर यांनी तयार केली. त्यांच्यामुळेच आज आपण परिनिर्वाणाची दृश्य पाहू शकतो.

ते स्वतः उत्तम कॅमेरामॅन होते, ते दिग्दर्शक होते, निर्माते होते.. त्यांनी मराठी चित्रपट क्षेत्रात काही चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसे ते राजकीय विश्वातही बरेच सक्रिय होते. ते आमदारही झाले आहेत. त्यांचा जीवनप्रवास या माध्यमातून आपल्याला अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे ही भूमिका प्रसाद करणार असल्याने प्रेक्षकांची उत्कंठा अधिकच वाढली आहे. परिनिर्वाण सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.