Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रात्री घरात घुसला आणि नको ते काम केलं ! लोकांनी पोलिसाला थेट खांबाला बांधलं

रात्री घरात घुसला आणि नको ते काम केलं ! लोकांनी पोलिसाला थेट खांबाला बांधलं


18 सप्टेंबर 2023 : लोकांचं रक्षण करता याव, त्यांना सुरक्षित वाटावं आणि कायदा कोणी मोडू नये, याकडे लक्ष देणं हे खरंतर पोलिसाचं काम असतं. कायदा मोडणाऱ्यांना वठणीवर आणणं हे देखील त्यांचं कर्तव्य असतं. पण हा रक्षकच भक्षक बनला तर ? कायद्याचं पालन करण्यास शिकवणाऱ्याने तो तोडून लोकांना त्रास दिल्याची एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. एका मुलीची विनयभंग करणाऱ्या पोलिसाची नागरिकांनीच चांगलीच धुलाई केली असून त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

स्थानिकांनी त्या पोलिसाचे कपडे काढून त्याला खांबाला बांधत त्याला बेदम चोप दिला. एवढेच नव्हे तर त्यानंतर नागरिकांनी तेथील स्थानिक पोलिसांना या घटनेची सूचना दिली आणि घडलेला प्रकार कथन केला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपी पोलिसाला अटक केली व घेऊन गेले. आग्रा येथे हा संपूर्ण प्रकार घडला आहे. संदीप असे आरोपी इन्स्पेक्टरचे नाव आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार संदीपला तत्काळ निलंबित करण्यात आले असून त्याची विभागीय चौकशी सुरू आहे. एत्मादपूर पोलीस स्टेशन बरहन परिसरात ही घटना घडली.

गावकऱ्याच्या घरात घुसला होता पोलिस

रविवारी रात्री उशीराच्या सुमारास पोलिस असलेला संदीप हा एका गावकऱ्याच्या घरात घुसला होता. आणि त्याने घरातील मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असा आरोप गावकऱ्यांनी लावला आहे. त्याच्या या कृतीमुळे पीडित मुलीने जोरात ओरडायला सुरूवात केली. तिचा आवाज ऐकून कुटुंबिय तिच्या खोलीत आले आणि त्यांनी आरोपी पोलिसाला पकडले.

व्हिडीओ झाला व्हायरल



आरोपी पोलिस अधिकारी हा बरहन ठाण्यात कार्यरत आहे. त्याला खांबाला बांधून मारहाणा करण्यात आल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्या पोलिस अधिकाऱ्याला एका खांबाला बांधण्यात आले असून त्याच्या अंगावर अंतर्वस्त्राशिवाय कपडे नाहीत, हे व्हिडीओमध्ये दिसत आहे. काही लोकांनी त्याला मारहाणही केली. मात्र स्थानिक पोलिस तेथे पोहोचले आणि आरोपीवर कारवाई करण्याचे आश्वासन संतप्त नागरिकांना दिले. आरोपी पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.