अवैध दारू विक्रेत्यांवर एकाचवेळी चार ठिकाणी छापा, साठा जप्त चकलांबा पोलिसांची कारवाई
बीड : सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सव तसेच आगामी ईदच्या पार्श्वभूमीवर चकलांबा पोलिसांनी अवैध व्यवसायावर कारवाईचा धडाका लावला आहे. रविवारी अवैध दारू विक्रेत्यांवर एकाचवेळी चार ठिकाणी छापा टाकून ७ हजार ९२५ रूपयांचा दारूसाठा चकलांबा पोलिसांनी जप्त केला.
चकलांबाचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांना विविध ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथके पाठवून हॉटेल गारवाच्या पाठीमागे पत्राच्या शेडमध्ये, उकड पिंपरी ते साक्षाळ पिंपरी रोडवरील सिंहगड हॉटेल, चकलांबा येथील हॉटेल सूर्या तसेच राक्षस भवन ते गुळज रोडवरील एका पत्रा शेड वर छापा टाकून माऊली रावसाहेब खेडकर, रातींतरवणी तिंतरवणी, सचिन बापूराव काशीद (रा साक्षाळ पिंपरी), केशव शेषराव खेडकर (रा चकलांबा) तसेच भगवान मधुकर पाटील (रा सुरळेगाव) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून देशी, विदेशी दारूचा साठा जप्त केला.
चकलांबा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंता तांगडे, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर इंगळे, राम बारगजे, खेडकर, केदार, खेत्रे, मिसाळ, सुरवसे, पवळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.