Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर धावत्या टॅक्सीत अत्याचार, नंतर रस्त्यावर फेकून केले पलायन

मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर धावत्या टॅक्सीत अत्याचार, नंतर रस्त्यावर फेकून केले पलायन 


मुंबईत गतीमंद असलेल्या अल्पवयीन मुलीवर धावत्या टॅक्सीत अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेने मुंबई हादरली आहे. आरोपींने धावत्या टॅक्सीत पीडितेवर अत्याचार केले आणि नंतर तिला रस्त्यावर फेकून तेथून पळून गेले. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयीत आरोपींना ताब्यात घेतले आहे. यात एका टॅक्सी चालकाचाही समावेश आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी 18 सप्टेंबर रोजी एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे तिच्या कुटुंबीयांशी काही कारणावरून भांडण झाले. त्यानंतर ती रागाच्या भरात घराबाहेर पडली आणि मालवणी परिसरात राहणाऱ्या तिच्या नातेवाईकाच्या घरी जाण्यासाठी प्रकाश नावाच्या व्यक्तीच्या टॅक्सीमध्ये बसली. परंतु टॅक्सीचालकाची वाईट नजर तिच्यावर पडली. मालवणीकडे जाताना टॅक्सी दादर परिसरात आली तेव्हा चालकाने त्याच्या ओळखीच्या 26 वर्षीय तरुणाला सलमानला टॅक्सीमध्ये बसवले आणि मालवणीकडे निघाला.

दादर ते सांताक्रूझ अत्याचार

दादर ते सांताक्रूझ दरम्यान धावत्या टॅक्सीत सलमानने त्या अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार केले. मालवणी येथे पोहोचल्यावर त्यांनी पीडितेला टॅक्सीतून खाली उतरवून तेथून पळ काढला. पीडितेने कशीतरी आपल्या नातेवाईकाच्या घरी पोहोचून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर नातेवाईकांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

दोन तासांत आरोपींना अटक

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने आरोपींचा शोध सुरू केला आणि अवघ्या दोन तासांत पोलिसांनी आरोपी सलमान आणि टॅक्सी चालक प्रकाश यांना अटक केली. प्रकाशवर सलमानला मदत केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध बलात्कार आणि बाल लैंगिक अस्तित्वाचे संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.



काय म्हणाले पोलीस?

पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींची वैद्यकीय तपासणीही करण्यात येणार आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.