Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पत्नीला मारहाण कराल तर व्हाल बेघर; न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय

पत्नीला मारहाण कराल तर व्हाल बेघर; न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय 


पुणे, 15 सप्टेंबर : अनेक ठिकाणी मारहाणीच्या घटना घडतात. कधी पत्नी पतीला मारहाण करते तर कधी पती मारहाण करुन पत्नीचा छळ करतो. अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अनेक धक्कादायक विचित्र प्रकरणे समोर येत असतात.

असंच एक प्रकरण सध्या समोर आलं आहे ज्यामध्ये मारहाण करणाऱ्या पतीला पत्नीच्या घरी प्रवेश मिळणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीला न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. त्याची पत्नीच्या घरातील एण्ट्री बंद केली आहे. पत्नीच्या घरात प्रवेश करु नये असा आदेश न्यायालयाने पत्नीला दिला.


पत्नीने पतीपासून संरक्षण मिळावे म्हणून न्यायालयात धाव घेतली होती अखेर तिचा अर्ज मंजून झाला आणि पतीला पत्नीच्या घरी जायला बंदी घातली. पास्ता खाऊन झोपला परत उठलाच नाही, व्यक्तीसोबत घडलं भयावहहे समोर आलेलं प्रकरण राहुल आणि सेजल नावाच्या पती पत्नीचं आहे. पतीनं पत्नीवर संशय घेत तिला मारहाण करत तिचा छळ करत होता. या कारणामुळे तिने अॅड. पुष्कर पाटील आणि अॅड. प्रणव मते यांच्यामार्फत घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. 

पतीपासून संरक्षण मिळावे अशी मागणी तिनं केली होती.दरम्यान, युक्तीवाद करताना पतीकडून कोणताही प्रतिक्रिया मांडण्यात आली नाही. संधी देऊनही त्यांनी त्यांची बाजू मांडली नाही. त्यामुळे पत्नीने केलेली संरक्षणाची मागणी लक्षात घेत जज वि. पी खंदारे यांनी त्यांची मागणी मंजूर केली. न्यायालयाने पत्नीवर हिंसाचार, संपर्क, घरात प्रवेश अशा गोष्टी करण्यावर बंदी घातली. हे प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.