Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

समीर चौघुलेनं सांगितला धक्कादायका अनुभव

समीर चौघुलेनं सांगितला धक्कादायका अनुभव

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नं सगळ्यांना वेड लावलं आहे. या कार्यक्रमाचे चाहते फक्त भारतात नाही तर परदेशात देखील आहेत. मालिकेतील सगळेच कलाकार म्हणजे समीर चौघुले, प्रसाद खांडकेर, गौरव मोरे ते दत्तू मोरे पर्यंत सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यातही या कार्यक्रमाची सुत्रसंचालक प्राजक्ता माळी देखील या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. या कलाकारांच्या स्किट नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकतात. त्यात अनेकदा समीर चौघुलेच्या स्किटचे सगळेच कौतुक करताना दिसतात. दरम्यान, लेखन करताना आता कोणत्या मर्यादा याविषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.


समीरनं राजश्री मराठीला ही मुलाखत दिली होती. यावेळी समीर चौघुले हा लेखनावर येणाऱ्या मर्यादांविषयी बोलताना दिसला. समीर म्हणाला, 'हास्यजत्रेतील प्रत्येक स्किटसाठी एक क्रिएटिव्ह टीम काम करत असते. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सरांनी यात पिढ्या घडवल्या आहेत. खरंतर, त्यांचं मार्गदर्शन लाभतंय हे आमचं भाग्यचं आहे. त्यामुळे विषयांची निवड करण्यासाठी आमची एक स्वतंत्र बैठक होते. सध्याच्या काळात लेखक म्हणून अनेक बंधनं आहेत. कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण, अलीकडे लोकांच्या भावना या काचेपेक्षा नाजूक झाल्या आहेत. त्यामुळे आमची लेखकांची मिटींग जवळपास 10 तास वगैरे चालते.'


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.