Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सई ताम्हणकरने मुंबईत खरेदी केलं स्वत:चं पहिलं घर

सई ताम्हणकरने मुंबईत खरेदी केलं स्वत:चं पहिलं घर

मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीने आता मुंबईत स्वत:चं पहिलं घर खरेदी केलं आहे. पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सांगलीची सई ताम्हणकर आता खऱ्या अर्थाने मुंबईकर झाली आहे. अभिनेत्रीने नवं घर घेतलं असलं तरी जुन्या घरातून मात्र तिला पाय निघत नाही आहे.


सई ताम्हणकर झाली मुंबईकर!

सई ताम्हणकर मुंबईकर झाली आहे. नव्या घराबद्दल चाहत्यांनी माहिती देत तिने एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलं आहे,"माझं अकरावं घर...आज पुन्हा एकदा मनात भाती आणि उत्साह असून नव्या घरात पाऊल ठेवत आहे. खऱ्या अर्थाने आज एक स्वप्न पूर्ण झालं आहे. मुंबईतलं पहिलं घर घेतलं असून आज या घरात गृहप्रवेश करताना एक वेगळाच आनंद आहे. एक मैलाचा दगड गाठला आहे. घरासोबत प्रत्येकाच्या वेगळ्या आठवणी असतात. त्यामुळे प्रत्येकासाठीच घर हे खूप खास असतात."

#jayshriram 🙏🙏
https://www.instagram.com/reel/CwraaZZIuBP/?igshid=YTUzYTFiZDMwYg==

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.