Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रस्त्यावर अत्यंत वाईट अवस्थेत सापडले गौतमी पाटीलचे वडील



गौतमी पाटील ही आपल्या स्टेज शोमुळे राज्यभरात प्रसिद्ध आहे. गौतमी पाटीलच्या खासगी आयुष्याशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. धुळ्यात गौतमी पाटीलचे वडील सापडले बेवारस अवस्थेत सापडले.सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले

गौतमी पाटीलकडून अद्याप वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस केली नसल्याचे सांगण्यात येत आहे.गौतमीचे अन्य नातेवाईक मात्र धुळ्यात दाखल झाले आहेत.रवींद्र पाटील असे त्यांचे नाव आहे.बेवारस अवस्थेत सापडलेल्या रवींद्र पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

गौतमीचे वडील रवींद्र पाटील हे गेल्या कित्येक वर्षांपासून मुलगी आणि पत्नीपासून वेगळे राहत आहेत. कौटुंबिक वादामुळे गेली अनेक वर्षे त्यांची भेट झालेली नाही. गौतमी वादात सापडलेली असताना रवींद्र पाटील यांनी माध्यमांसमोर येत तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एकदा तरी गौतमीने भेटण्यासाठी यावं आपल्याला पुन्हा पप्पा म्हणून हाक मारावी, अशी अपेक्षाही रवींद्र पाटील यांची आहे. मात्र गौतमीने यावर स्पष्टपणे भाष्य केलेलं नाही. हा घरगुती प्रश्न असल्याचे गौतमीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते.
"मी इथपर्यंत कशी आले याची गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती. हा घरगुती प्रश्न असल्याने यामध्ये मी काही बोलू शकत नाही. मी एकट्याने निर्णय घेणारी मुलगी नाही. माझ्या मागे आई आहे अजून. मी यावर नाही बोलू शकत. घरगुती वाद असल्याने तो इथे आणू शकत नाही," असे गौतमी पाटीलने स्पष्ट केल होते.

काय म्हणाले होते गौतमीचे वडील?

"गौतमीची खूप आठवण येते. ती आणि तिच्या आईने पुन्हा आपल्या सोबत राहावं. आपण गौतमीच्या कायम पाठीशी आहोत. एकदा तरी गौतमीने भेटण्यासाठी यावं आपल्याला पुन्हा पप्पा म्हणून हाक मारावी," असे गौतमीचे वडील रवींद्र पाटील म्हणाले. यासोबत गौतमीच्या आडनावावरुनही त्यांनी भाष्य केले आहे. तिचं आडनाव पाटीलच आहे, तर ते पाटील आडनाव कसं काढणार? गौतमीप्रमाणेच अनेक कलाकार त्यांची कला सादर करतात आणि त्यांनी त्यांचं आडनाव काढावं म्हणून कोणी का बोलत नाही? असा सवाल रवींद्र पाटील यांनी काही दिवसांपुर्वी केला होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.