'हात कापून टाकेन,' वरळी सी-लिंकवर रोखल्याने महिला बाईकरची पोलिसांना धमकी
वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याने पोलिसांनी रोखलं असता, महिला दुचाकीस्वाराने पोलिसांनाच अर्वाच्च भाषेत शिवागीळ करत धमकावलं. मुंबईतील वांद्रे वरळी सी-लिंकवर ही घटना घडली. महिला पोलिसांना धमकावत असतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही महिला वास्तुविशारद असून पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिलेने दुचाकी रोखल्यानंतर ती बंद करण्यास सांगितलं असता पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्कीही केली. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन केल्यानंतरच मी बाईक बंद करणार अशा शब्दांमध्ये वाद घातला.
महिला दुचाकीस्वार पोलिसांशी वाद घातलानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महिला वरळी सी-लिंकवर दुचाकी पळवत असल्याने पोलीस कर्मचाऱ्याने तिला रोखलं होतं. यावेळी महिलेने आपली चूक मान्य करण्याऐवजी वाद घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान, तिने पोलिसांसाठी अपशब्द वापरले.
महिलेला रोखण्यात आलं असता, पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला बाईक बंद करण्यास सांगितलं. पण तिने नकार दिला. इतकंच नाही तर कर्मचाऱ्याने बाईक बंद करण्याचा प्रयत्न केला असता, ती संतापली आणि जाहीरपणे धमकावू लागली. 'हात कापून टाकेन, माझ्या गाडीला हात लावण्याची हिंमत कशी झाली,' अशा शब्दांत महिलेने धमकी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.