Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बॅंक ऑफ महाराष्ट्रामध्ये नेमक चाललय तरी काय ? ग्राहकांचे पैसे किती सुरक्षित? एवढा निष्काळजीपणा ?

बॅंक ऑफ महाराष्ट्रामध्ये नेमक चाललय तरी काय? ग्राहकांचे पैसे किती सुरक्षित? एवढा निष्काळजीपणा ? 


बँक ऑफ महाराष्ट्र ही ग्राहकांच्या अत्यंत विश्वासातील आणि आर्थिकदृष्ट्या भक्कम असलेली बँक म्हणून प्रसिद्ध आहे. बँकेच्या ग्राहकांमध्ये सर्वाधिक संख्या ही मध्यमवर्गीयांची आहे. हाच मध्यमवर्गीय ग्राहक, बँक ऑफ महाराष्ट्रच्या अनेक योजनांमध्ये अल्प बचतीपासून ते मोठी गुंतवणूक व्याजाचे वार्षिक दर पाहून स्वतःच्या शक्य कालावधीसाठी गुंतवणूक करत असतो. मात्र करोडो लोकांचे पैसे बँकेत असताना याच बँकेच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक बातमी समोर आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र - कर्मचाऱ्यांकडून निष्काळजीपणाचा कहर


मावळ तालुक्यातील कामशेत मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. कामशेत येथे असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या शटरला तब्बल तीन दिवसापासून टाळे लावले नसल्यामुळे उघडीच राहिली होती. ही बाब सकाळी नऊच्या सुमारास स्थानिक व्यापारी विलास बटेवरा यांच्या लक्षात आली. त्यांनतर त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. पोलिसांनी संबंधित बँकेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून हा सर्व प्रकार त्यानां सांगितला. यानंतर बँकेचे कर्मचारी ननावरे यांनी अकरा वाजण्याच्या सुमारास बँकेला कुलूप लावले. या घटनेतून पुन्हा एकदा बँकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.


बँकेत लाखो खातेदारांचे पैसे

दरम्यान, मावळ तालुक्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या बाजार पेठेत ही बँक ऑफ महाराष्ट्र कार्यकरत आहे. या बँकेत अनेक खातेदारांचे खाते असून पेन्शनर्स, नोकरदा, बचतगट, शेतकरी, व्यावसायिक, यांची खाती आहेत. कामशेत परिसरात एकमेव नॅशनल बँक असल्यामुळे लोकांना या बँकेशिवाय दुसरा पर्याय नाही. आधीच या बँकेबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यातच या घटनेमुळे बँकेचा बेजबाबदारपणा दिसून येत आहे. कुलूप न लावल्यामुळे बँक तब्बल तीन दिवस उघडीच होती. शुक्रवारी संध्याकाळी चार वाजल्यानंतर शटर खाली ओढून टाळे न लावताच बँकेतील सर्व कर्मचारी तसेच निघून गेले. त्यामुळे शुक्रवार, चौथा शनिवार आणि रविवारी अकरा वाजेपर्यंत बँकचे कुलूप न लावल्यामुळे बँक तब्बल तीन दिवस उघडीच होती. यामुळे नागरींकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या बँकेत अनेक खातेदारांचे पैसे जमा असून कदाचित काही घटना घडली असती, तर याला जबाबदार कोण? असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. संबंधित मॅनेजर आणि कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी तीव्र मागणी नागरिक करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस सागंली दर्पण डॉट कॉम जबाबदार राहणार नाही

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.