Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आज सिव्हिल रुग्णालयात जन्माला आले नाक,कान आणि डोळे नसलेले बालक

आज सिव्हिल रुग्णालयात जन्माला आले नाक,कान आणि डोळे नसलेले बालक 


सिव्हिल रुग्णालयात एका मातेने शनिवारी (दि.३०) सकाळी एका मुलाला जन्म दिला. या मुलाला जन्मतःच डोळे, कान आणि नाक नाही. याशिवाय मुलाचे डोके देखील मोठे असून बाळाला हातपाय.  मात्र, त्याला बोटे नाहीत. हे बाळ दिसायलाही सामान्य बाळासारखे नसून सिव्हिल रुग्णालयात २५ वर्षात पहिल्यांदा अशा प्रकारचे बाळ जन्माला आले आहे. जीन्स मधील त्रुटींमुळे अशा प्रकारचे मूल जन्माला येत असल्याचा दावा रुग्णालयातील डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. तीन लाखांमध्ये एक असे मूल जन्माला येत असून भारतापेक्षा परदेशात अशी मुले जन्माला येण्याचे प्रमाण जास्त असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, या बाळाला काचेच्या पेटीत ठेवण्यात आले असून या बाळावर उपचार सुरु असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दररोज हजारोंच्या संख्येने प्रसूती होत असून शनिवारी सकाळी ६ च्या दरम्यान मात्र एका मातेने ज्या मुलाला जन्म दिला. त्या बाळाला बघून सर्वाच्याच मनात आश्चर्य निर्माण झाले आहे. या बाळाबद्दल रुग्णालयाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. अशा प्रकारचे बाळ जन्माला आले की यावरून समाजात अनेक प्रकारच्या गोष्टी रंगवल्या जात असल्याने ही गुप्तता पाळण्यात आली आहे. दरम्यान, जे मूल जन्माला आले आहे. त्याला कान, नाक आणि डोळे नाहीत. त्याचे डोके मोठे असून हातापायाला बोटे नाहीत. तर या बाळाची त्वचा सामान्य मुलांसारखी नसून पूर्ण खडबडीत आहे. तीन महत्वाचे अवयव नसल्याने सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांकडून या बाळाची विशेष काळजी घेण्यात येत असून त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

हार्लेक्विन इचथिओसिस  असे या आजाराचे नाव असून हा एक गंभीर अनुवांशिक विकार आहे. जो त्वचेवर परिणाम करतो. या अवस्थेतील अर्भक त्यांच्या शरीराचा बराचसा भाग झाकून अत्यंत कठोर, जाड त्वचेसह अकाली जन्माला येतात. त्वचा मोठ्या, डायमंड-आकाराच्या प्लेट्स बनवते, ज्या खोल क्रॅक (फिशर) द्वारे विभक्त होतात. या त्वचेच्या पापण्या, नाक, तोंड आणि कान यांच्या आकारावर परिणाम करतात आणि हात आणि पाय यांच्या हालचाली मर्यादित करतात. छातीच्या मर्यादित हालचालीमुळे हार्लेक्विन इचथिओसिस असलेल्या बाळांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्वचा सामान्यतः शरीर आणि त्याच्या सभोवतालच्या वातावरणामध्ये संरक्षणात्मक अडथळा बनवते. हार्लेक्विन इचथिओसिसशी संबंधित त्वचेच्या विकारामुळे हा अडथळा बाधित होतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.