Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लग्नच जुळत नाही. आता वयही होत चाललय, मुली बघण्यासाठी तरी रजा द्या; पोलिस हवालदाराची मागणी

लग्नच जुळत नाही. आता वयही होत चाललय, मुली बघण्यासाठी तरी रजा द्या; पोलिस हवालदाराची मागणी 


उत्तर प्रदेशमधील एका पोलिस हवालदाराच्या रजेचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रजा का हवी यासाठी त्याने रजेच्या अर्जात लिहिलेले कारण अजब असल्याने हा अर्ज चर्चेचा विषय ठरला आहे. त्याच्या या कारणामुळे त्याला रजाही लगेच मंजूर करण्यात आली आहे. सदर हवालदाराने हा अर्ज आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला लिहिला आहे. अर्जातले कारण वाचून वरिष्ठ अधिकाऱ्याने देखील पाच दिवसाची रजा मंजूर केली आहे.

फारूखाबाद जिल्ह्यातील कद्रीगेट पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून तैनात असलेले राघव चतुर्वेदी यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाच दिवसांच्या रजेसाठी अर्ज केला. या अर्जामध्ये राघव यांनी लग्नासाठी मुलगी बघायला जायचे असल्याने पाच दिवसांसाठी रजा मंजुर करावी असे लिहिले आहे. हवालदार राघव चतुर्वेदी यांनी अर्जामध्ये 'माझ्या वडिलांनी माझ्या लग्नासाठी एक मुलगी पाहिली आहे. नोकरीला रुजू होऊन आता 3 वर्षे झाली असून अद्याप लग्न झालेले नाही. अलिकडे पोलिसांत नोकरी करणाऱ्या मुलांना कोणी मुली देईनासे झाले आहेत. त्याबरोबरच चांगले स्थळ मिळणे देखील अवघड होऊन बसले आहे. तसेच माझे लग्नाचे वय देखील आता उलटून चालले आहे. त्यामुळे कृपया पाच दिवसांची रजा मंजुर करावी अशी विनंती आहे. तुमचे माझ्यावर खूप उपकार होतील,' असा मजकूर लिहिला आहे.


हा भावनिक मजकूर वाचून राघव यांच्या वरिष्ठांनी देखील त्यांना पाच दिवसांची रजा मंजूर केली आहे. आता या अर्जाचा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. यावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. राघव यांनी अर्जात लिहिलेली परिस्थिती खरी असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.