Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अखेर पृथ्वीवर एलियन्स सापडलेच, शास्त्रज्ञांनी आता पुरावाही दिला

अखेर पृथ्वीवर एलियन्स सापडलेच, शास्त्रज्ञांनी आता पुरावाही दिला

नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : एलियन्स आहेत की नाहीत यावर वादच आहेत. लवकरच परग्रहावरील एलियन्स पृथ्वीवर लवकरच येणार, अशी शक्यता व्यक्त केली जाते. तर काही लोक आपण एलियन्स पाहिल्याचा दावाही करतात. पण आता खरंच एलियन्स पृथ्वीवर सापडले आहेत. शास्त्रज्ञांनी याचा पुरावाही दिला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून सर्वांना धक्का बसला आहे.जिवंत नाही पण मृत एलियन्स सापडले आहेत.

एलिन्यसचे मृतदेह मेक्सिकोतील एका कार्यक्रमात सादर करण्यात आले. शास्त्रज्ञांच्या मते, ते एक हजार वर्षे जुने आहे. स्पॅनिश न्यूज वेबसाइट marca नुसार, शास्त्रज्ञांनी मेक्सिकन संसदेत अधिकृत कार्यक्रमादरम्यान दोन कथित एलियन्सचे मृतदेह जगासमोर सादर केले. मेक्सिकन युफोलॉजिस्ट जेम मावसन यांनी या एलियनच्या मृतदेहांचे वर्णन केलं.

जेम मावसन अनेक दशकांपासून अशा घटनांवर काम करत आहे. परग्रहाबाबत त्यांनी बरंच संशोधन केलं आहे.शास्त्रज्ञांनी डीएनए पुराव्याचंही विश्लेषण केलं आणि दावा केला की हे मृतदेह यूएफओच्या ढिगाऱ्यातून सापडले आहेत. हे UFO पेरूच्या कुज्को इथं क्रॅश झालं होतं. हे मृतदेह अनेक शतके ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि नंतर त्यांचं जीवाश्म बनलं.


 

शास्त्रज्ञांनी रेडिओकार्बन डेटिंगच्या मदतीने त्यांच्या डीएनए पुराव्याचंही विश्लेषण केलं आहे. ते हजार वर्षांहून जुने असल्याचं आढळून आले. हार्वर्डच्या खगोलशास्त्र विभागाचे संचालक प्रोफेसर अब्राहम अवी लोएब व्हिडिओ कॉलद्वारे या कार्यक्रमाशी जोडले गेले. त्यांनी मेक्सिकन सरकारला एलियन्सच्या शक्यतांवर आणखी काम करण्यास परवानगी देण्याची विनंती केली.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये एका बॉक्समध्ये दोन मृतदेह ठेवलेले दिसत आहेत.


ते माणसांपेक्षा वेगळे आहेत. असं सांगण्यात आलं आहे. अमेरिकेच्या सेफ एरोस्पेसचे कार्यकारी संचालक आणि यूएस नेव्हीचे माजी पायलट रचना ग्रेव्हज देखील उपस्थित होते. त्यांनी याला आश्चर्यकारक म्हटलं आहे.Scientists unveiling two alleged alien corpses took place in Mexico, which are retrieved from Cusco, Peru. pic.twitter.com/rjfz9IMf37- Indian Tech & Infra (@IndianTechGuide) September 13, 2023@IndianTechGuide अकाउंटवरून ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. न्यूज १८ मराठी याचं समर्थन करत नाही किंवा याची हमी देत नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.