Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ब्रिटनमधील गणेशोत्सव पोलीसांनी रोखला?

ब्रिटनमधील गणेशोत्सव पोलीसांनी रोखला?


 महाराष्ट्रासह देशभरातील काही ठिकाणी धुमधडाक्यात गणेश उत्सव चालू असतानाच ब्रिटनमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल  झाला आहे. ब्रिटनच्या लिसेस्टर  शहरात पोलिस आणि काही नागरिकांमध्ये बाचाबाची होत असतानाचा व्हिडीओ दिसत आहे. मात्र हा व्हिडीओ ब्रिटनमधील गणेशोत्सवाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. लिसेस्टर शहरातील एका भारतीय पुजऱ्याला पूजा करण्यापासून रोखले असून त्याच्याबरोबर बाचाबाची केल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ब्रिटनमधील पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.

पोलिसांची अरेरावी

ब्रिटनमधील लिसेस्टरमधील हा व्हिडीओ व्हायरल होताच लिसेस्टर पोलिसांनी सांगितले की, 18 सप्टेंबर रोजी बेलग्रेव्ह रोडवर एक धार्मिक उत्सव साजरा करण्यात येत होता. मात्र या धार्मिक उत्सवासाठी रितसर परवानगी मागण्यात आली नव्हती. तरीही मिरवणूक काढण्यात येत होती. त्यावेळी तिथे पोलिस पोहचल्यानंतर त्या मिरवणुकीतील लोकांकडून पोलिस माहिती घेत होते असंही पोलिसांनी स्पष्ट केले.

उत्सवासाठी परवानगी नव्हती

लिसेस्टरमधील पोलिसांनी सांगितले की, या सभेसाठी परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे ही मिरवणूक चालू असताना वाहतूक सुरळीत करण्यासाठीही तेथील नागरिकांबरोबर चर्चा करण्यात सुरु होती. त्याच बरोबर हा उत्सव सुरक्षितपणे साजरा करण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात येत होत्या. त्यामुळे त्या ठिकाणी पोलीस उपस्थित होते असंही स्पष्टीकरण देण्यात आले.

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावरुन व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन पोलिसांना आता धर्म आणि जातीय गोष्टीवरुन टीका करण्यात येत आहेत. पोलिसांना ट्रोल करण्यात आल्याने अजूनही लिसेस्टर पोलिसांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.

हिंदू-मुस्लिम वाद नाही

बीबीसीच्या वृत्तानुसार 18 सप्टेंबरच्या रात्री शहरातील हेरवुड रोडवरील मशिदीजवळ आवाजाच्या तक्रारीवरून पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. मात्र तिथे वाद न होता हिंदू आणि मुस्लिम नागरिकांबरोबर बोलून हे प्रकरण शांत करण्यात आले होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.