Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतीय विद्यार्थिनीला चिरडल्या प्रकरणी कारवाईची मागणी; घटनास्थळी निदर्शने

भारतीय विद्यार्थिनीला चिरडल्या प्रकरणी कारवाईची मागणी; घटनास्थळी निदर्शने 


पीटीआय, सीएटल (अमेरिका) : मृत भारतीय विद्यार्थिनी जान्हवी कंडुला हिला न्याय मिळावा, संबंधित दोन दोषी पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे या मागणीसाठी विविध समुदायांचे दोनशेपेक्षा जास्त नागरिक या विद्यार्थिनीला जेथे वेगवान पोलीस गस्ती वाहन धडकले, त्या घटनास्थळी एकत्र आले होते.

त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेधही केला. २३ जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेत हे पोलीस गस्ती वाहन केविन डेव्ह ताशी ७४ मैल प्रतितास (ताशी ११९ किलोमीटर) या वेगाने चालवत होता.  त्याने बेदरकारपणे हे वाहन चालवत रस्ता ओलांडत असलेल्या २३ वर्षीय जान्हवीला धडक दिली. सिएटल पोलीस विभागाने सोमवारी प्रसृत केलेल्या ध्वनिचित्रफितीत पोलीस अधिकारी डॅनियल ऑडरर याने या अपघातानांतर हसत प्रतिक्रिया देताना डेव्हचा यात दोष नसल्याचे सांगून, या गुन्ह्याचा तपास गरजेचा नसल्याचे सांगत असल्याचे दिसत आहे. दुर्घटनास्थळ असलेल्या या चौकात गुरुवारी दोनशेपेक्षा जास्त नागरिक जमले. त्यांनी जान्हवीला वाहनाची धडक दिल्याबद्दल डेव्ह आणि त्याचा वरिष्ठ पोलीस अधिकारी ऑडरर यांचे कृत्य घृणास्पद असल्याचे सांगितले.

वर्णद्वेषाचा आरोप

यावेळी विविध वक्त्यांनी पोलीस यंत्रणेवर सडकून टीका केली. ही पोलीस यंत्रणा श्वेतवर्णीयांच्या वर्चस्ववादाच्या प्रभावाखाली आहे. कृष्णवर्णीय, स्थानिक रहिवासी आणि इतर गौर वर्णीय नसलेल्या नागरिकांवर विनाकारण गुन्हे दाखल केले जातात, त्यांची अवहेलना केली जाते, असा सूर या वक्त्यांच्या भाषणाचा होता, असे वृत्त 'सिएटल टाइम्स'ने दिले आहे.

गांभीर्याने तपास करण्याची मागणी

वॉशिंग्टन : अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रतिनिधीगृह सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी भारतीय विद्यार्थिनी जान्हवी कंडुलाच्या मृत्यूचा गांभीर्याने तपास करण्याची मागणी केली. भरदार वेगातील पोलीस वाहनाच्या धडकेने २३ वर्षीय जान्हवीच्या मृत्यूनंतर डॉलरमध्ये तिच्या जिवाचे मोल सांगून तिच्या मृत्यूची थट्टा करणाऱ्या गौरवर्णीय पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.